ग्राम विकास मंत्रालय व जिल्हा परिषद गोंदिया ने केली शिक्षकांची दिशाभूल

0
53

गोंदिया,दि.16 :- महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागांतर्गत राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या करिता एन आय सी पुणे मार्फत बदली पोर्टल सुरू केले’ सन 2017-18 या वर्षापासून सुरू झालेला बदली पोर्टल राज्यात वादात्मक ठरला आहे व कितीतरी याचिका कोर्टात दाखल करण्यात आल्या.
वादाच्या भोवऱ्यात असलेल्या बदली पोर्टल मार्फत सत्र 2018-2019 ला पुन्हा सुरू करण्यात आले गोंदिया जिल्हा परिषदेत जिल्हांतर्गत बदली करिता बदली पात्र शिक्षकांची यादी , रिक्त पदांची यादी (clear vacancy),समानीकरण याची यादी (compulsary vacancy)ची यादी दिनांक स:-7/6/19 ला प्रकाशित करण्यात आली व दिनांक 8 जून 2019 ला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगीन वरून बदली पोर्टल सुरू करून शिक्षकांना बदली करीता 20 शाळांच्या पसंतीक्रम घालण्याकरिता मुभा देण्यात आली व बदलीपात्र शिक्षकांनी पोर्टल वर आपली माहिती दिनांक:7/6/2019ला प्रकाशित केल्या रिक्त पदानुसार आपला पसंतीक्रम दाखल केला जिल्ह्यातील शिक्षकांची सर्व माहिती अपलोड झाल्यानंतर दिनांक 11 जून 2019 ला रात्री12:00 वाजता पोर्टल बंद करण्यात आले.
11 जून ला बदली पोर्टल बंद केल्यानंतर दिनांक 14 जून 2019 ला जिल्हा परिषदेमार्फत रात्री पुन्हा बदली पोर्टल सुरू करून दिनांक 7 जून 2018 ला प्रकाशित केलेल्या रिक्त पदांच्या यादीतील 28 जागा कमी करण्यात आल्या व पुन्हा पोर्टल बंद करण्यात आले यामुळे बदलीपात्र 537 शिक्षकांनी दिनांक 8 ते 11 जून 2019 या कालावधीत या 28 जागांना आपला पसंतीक्रम दर्शविला होता त्यांची दिशाभूल करण्यात आली यामुळे गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा अनागोंदी व भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत आहे नेहमी वादाच्या भोवऱ्यात असलेली बदली प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील शिक्षकावर विस्थापित होण्याची पाळी येईल करिता गोंदिया जिल्ह्यातील बदली प्रक्रिया रद्द करण्यात यावी किंवा समानीकरण याच्या राखून ठेवलेल्या जागा खुल्या करण्यात येऊन सर्व शिक्षकांना पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांच्या लॉगिन वर फार्म भरून पसंतीक्रम भरण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आली आहे.