संघटनेशिवाय सामाजिक लढा अशक्य:- मनोहर चंद्रिकापुरे

0
17

अर्जुनी मोरगाव,दि.16:- शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजचा तरुण उद्याचा भारताचा आधारस्तंभ आहे. त्याला सर्वाथाने स्वयंमपुर्ण मजबुत बनविण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे आहे. शिक्षणाने मानवाच्या ज्ञान कक्षा रुंदावतात मानुस अधिक प्रगल्भ बनतो. संघटने बद्दल प्रवृत्त होतो. आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे काम ह्या संघटना करत आहेत. ज्याप्रमाणे आपण क्रांतिवीर बिरसामुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्याचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण संघटित झाले पाहिजे. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा प्रतिकार करणे हे महत्त्वाचे आहे. संघटनेशिवाय सामाजिक लढा अशक्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी केले.
गवर्रा येथे क्रांतिसुर्य बिरसामुंडा यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात उदघाटक स्थानावरून मार्गदर्शन करतांना चंद्रिकापुरे बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे होते.यावेळी प्रकाश गहाणे, योगेश नाकाडे,सुशीला हलमारे, शिलाताई उईके,रामलाल मुंगणकर,कुंडलिक लोथे, गोर्वधन ताराम, मंसाराम कोकोडे, संचित वाळवे,शुभांगी तिळके, आनंद तिळके, प्रभा कुंभरे, रेशीम लोथे, गजानन कोवे, शुशील गहाणे, रुमाजी नंदेश्वर, पंचम भलावी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रिकापुरे पुढे म्हणाले की, गरीबी नष्ट करण्याचे मुळ शास्त्र शिक्षण शास्त्र आहे. शिक्षणशास्त्राचा अंगीकार करुन गरीबीवर मुठ माती करता येतो. ज्या बिरसामुंडानी आपल्या अख्खा आयुष्यात कधीही मद्य पान केले नाही. आम्ही त्यांचे वंशज मद्यपानाच्या आहरी जावुन आपल्या मुलांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवत आहोत. आपण आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले पाहिजे. गावामध्ये वाचनालय तयार केले पाहिजे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही,असे चंद्रिकापुरे म्हणाले.प्रास्ताविक राजु कोलाम संचालन कविता उईके, देवानंद कुंभरे यांनी केले.