मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खात

0
28

मुबंई,दि.17ः-राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला.रविवारला झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकूण 13 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली दरम्यान, या मंत्र्यांचे खातेवाटप संध्याकाळी जाहीर झाले आहे. या खातेवाटपामध्ये राधाकृष्ण विखे-पाटील  यांना गृहनिर्माण तर जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार आणि फलोत्पादन खाते मिळाले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांचे खाते डॉ. सुरेश खाडे यांना देण्यात आले असून, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचे खाते प्रा. डॉ. अशोक उईके यांना देण्यात आले आहे.भंडारा-गोंदियाचे विधानपरिषद सदस्य फुके यांना बांधकाम ,वन व आदिवासी विभागाचे राज्यमंत्रीपद देण्यात आले.

खातेवाटपाची यादी पुढीलप्रमाणे
1) राधाकृष्ण विखे-पाटील  – गृहनिर्माण
2) जयदत्त क्षीरसागर – रोजगार हमी व फलोत्पादन
3) आशीष शेलार – शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
4) संजय कुटे – कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण
5) सुरेश खाडे – सामाजिक न्याय
6) अनिल बोंडे – कृषी
7) अशोक उईके – आदिवासी विकास
8) तानाजी सावंत – जलसंधारण
9) राम शिंदे – पणन आणि वस्त्रोद्योग
10)  संभाजी पाटील  – अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण
11) जयकुमार रावल – अन्न व औषध प्रशासन, पर्यटन व राजशिष्टाचार
12) सुभाष देशमुख – सहकार, मदत व पुनर्वसन

राज्यमंत्री
1) योगेश सागर – नगरविकास
2) अविनाश महातेकर – सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य
3) संजय भेगडे –  कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन
4) परिणय फुके –  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), वने, आदिवासी विकास
5) अतुल सावे – उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्याक विकास आणि वक्फ