जागर फाऊंडेशनच्या वतीने बार्शी येथे मोफत करियर मार्गदर्शन शिबीर व आंतरराष्ट्रीय योग दिन

0
94

सोलापूर( बार्शी),दि.18ः-सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका या ठिकाणी भारत सरकार नेहरू युवा केंद्र व जागर फाउंडेशन बावी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी दहावी व बारावी नंतर पुढे काय या विषयावर तालुकास्तरीय मोफत मार्गदर्शन शिबिर व 21 जून योग दिनाचे औचित्य साधून “आंतरराष्ट्रीय योग” दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी रमेशजी घोलप यांचे बंधू उमेश घोलप (अध्यक्ष,उमेद प्रतिष्ठान बार्शी) सचिन वायकुळे( दैनिक संचार उपसंपादक) गणेश गोडसे (पत्रकार ,दैनिक पुढारी) मदन गव्हाणे (नगरसेवक, बार्शी नगरपालिका) पंढरीनाथ बोधनापोङ (पोलीस उपनिरीक्षक बार्शी पोलिस स्टेशन )विशाल चिपडे (संस्थापक ,जागर फाउंडेशन अस्मिता चिपङे (संचालिका स्पर्धाविश्व एक शैक्षणिक संकुल क्लासेस बार्शी) अनिल वेदपाठक (शिष्य रामदेव बाबा पतंजली योग समिती) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सांगली जिल्ह्यातील तालुका जत मधील बाबरवस्ती (पांडोझरी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील पर्यावरण प्रेमी शिक्षक दिलीप मारोती वाघमारे यांनी दुष्काळी तालुक्यातील आठ वर्षातील वृक्ष लागवड व संगोपन या सामाजिक कार्याची दखल घेत नेहरू युवा केंद्र भारत सरकार व जागर फाउंडेशन कडून त्यांना “वनश्री” पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून अमोल कुलकर्णी (मराठी विभाग प्रमुख सुलाखे विद्यालय बार्शी) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर शिबिरात सोजर इंग्लिश मीडियम स्कूल बार्शी चे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सामाजिक, शैक्षणिक ,उद्योग, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकांसाठी उमेद प्रदान करण्याचे कार्य जागर फाउंडेशन व निर्मिती बहुउद्देशीय संस्था करत असतात. इयत्ता बारावी परीक्षेत कला शाखेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या कु. दिव्या किशोर रसाळ.कु. शितल बालाजी आगलावे.कु. शंकर अमृता शंकर डोईफोडे कु.धनश्री विठ्ठल आगलावे आदी यशवंत यांचा सत्कार समारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. सदरचे मोफत मार्गदर्शन शिबीर व योग साधना कार्यक्रम “स्पर्धाविश्व” एक शैक्षणिक संकुल क्लासेस बार्शी ओम हाॅटेल समोर श्रीकृष्ण मंदिराजवळ C/O जिव्हेश्वर हाॅल फुले प्लाॅट उपळाई रोङ बार्शी ता.बार्शी जि. सोलापूर या ठिकाणी दि.21 जुन 2019 रोजी सायं. 4:00 वाजता संपन्न होणार आहे.तरी या तालुकास्तरीय शिबिराचा लाभ तरुणांनी घ्यावा असे आवाहन जागर व निर्मिती बहुउद्देशीय संस्था बावी(आ) यांच्यावतीने करण्यात येते आहे