अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्याकडून अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात;२६ जिल्ह्यांत ४,४६१ कोटी अनुदान वाटप

0
33

मुंबई- राज्याचा 2019-20 चा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून सादर होत असलेल्या या अर्थसंकल्पात लोकाभिमुख योजना आणि सवलतींचा धडाका सुरू आहे. लांबलेला पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा कृषीउत्पादनात 8 टक्क्यांनी घट होईल, अशी चिंता आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आलीये. त्यामुळे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बळीराजाला कसा आधार देतात, याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

2014 मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने 28 फेब्रुवारी रोजी हंगामी अर्थसंकल्प सादर केला होता. यात 1 एप्रिल ते 31 जुलै 2019 या चार महिन्यांसाठी आवश्यक खर्चाची तरतूद करण्यात आली होती.

लाईव्ह अपडेट

– चालू आर्थिक वर्षात नगरविकास विभागाकरिता एकत्रित 35 हजार 791 कोटी 83 लक्ष 67 हजार रुपयांची तरतूद

– अटल अर्थसहाय्य योजनेकरीता 500 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध

– धनगर समाजातील बेघरांसाठी 10 हजार घरकूल बांधून देणार

– ओबीसी मुलींसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय

– संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील अर्थसहाय्यात वाढ

– राज्यात फिरते पशु वैद्यकीय चिकित्सालय स्थापन करणार

– धनगर समाजाच्या कल्याणासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद

– ओबीसी मुलांच्या वसतिगृहासाठी 200 कोटींची तरतूद

इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) 18 आणि मुलींसाठी 18 अशी एकूण 36 वसतीगृहे सुरु करण्यास मान्यता. याकरीता सन 2019-20 या वर्षात रु.200 कोटी इतका नियतव्यय राखून ठेवलेला आहे. इयत्ता 5 वी ते 10 वीत शिकणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय, या योजनेंतर्गत इयत्ता 5 वी 7 वी पर्यंतच्या विद्यार्थीनींना दरमहा रु.60 तर इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थीनींना दरमहा रु.100 याप्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार. या योजनेचा लाभ डीबीटीव्दारे 2 लक्ष 20 हजार विद्यार्थीनींना होणार आहे

– महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे सार्वजनिक बस वाहतुकीचा कणा

– अर्थसंकल्पावेळी विधान परिषदेत विरोधकांचा गोंधळ, 10 मिनिटांसाठी सभागृह तहकूब

– येत्या 5 वर्षाच्या कालावधीत 50 हजार शिक्षकांना प्रशिक्षित व प्रोत्साहित करण्याचा कार्यक्रम

– जळगाव गोंदिया चंद्रपूर येथे नवीन वैद्यकिय महाविद्यालय

– महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीसाठी 150 कोटींची तरतुद

– 139 गो शाळांसाठी प्रत्येकी 25 लाख रूपये देणार

– 2022 पर्यंत शिवडी न्हावा शेवा- मुंबई महामार्ग तयार होणार

– 60 लाख नवीन रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट

– कृषी सिंचन योजनेसाठी 2 हजार 720 कोटींची तरतूद

– गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ योजनेच्या व्याप्तीत वाढ

– राज्यातील 26 अपुर्ण सिंचन प्रकल्पांचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश

– आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगास मान्यता

– काजू उत्पादनात महाराष्ट्र देशात अग्रेसर

– 4 कृषी विद्यापीठांना 600 कोटी रुपयांची तरतूद

– 8946 कोटी रुपये निधी जलयुक्त शिवार योजनेत खर्च

– पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई नियंत्रण क्षेत्राची स्थापना

– शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी

– शेतीशी निगडीत कर्जवसुलीला स्थगिती

– केंद्राकडून दुष्काळ निवारणासाठी 4 हजार 563 कोटी रुपये

– नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ रु.6 हजार 410 कोटी एवढी तरतूद

– शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद, दुष्काळ निवारणासाठी मोठं काम