गृहनिर्माण संस्थांवर प्रशासकांच्या नेमणूकीसाठी अर्ज आमंत्रित

0
20

वाशिम, दि. १८ : गृहनिर्माण संस्थांवर प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनल तयार करण्यासाठी सहकार विभागाद्वारे पात्र उमेदवारांनाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर आणि सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी.ॲड.ए)/उच्चतम सहकार पदविका (एच.डी.सी.) धारक असावा. तसेच चार्टर्ड अकाऊटंट (सि.ए)/इन्सिटटयुट ऑफ कॉस्ट अँड वर्कस अकाऊटंट (आय.सी.डल्ब्य.ए)कंपनी सेक्रेटरी (सी.ए)सहकार खात्यातील प्रशासक किंवा लेखापरीक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारीनागरी/कर्मचारी सहकारी बँकांमध्ये व्यवस्थापक म्हणून काम केलेले उमेदवार सुध्दा प्रशासक पदासाठी पात्र आहे.

अर्जाचे विहीत नमुने अमरावती येथील विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, वाशिम येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे कार्यालय व सर्व तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयात उपलब्ध आहेत. अर्ज प्राप्त करण्याची व परीपूर्ण अर्ज स्वीकारण्याची अंतीम मुदत ३० जून  २०१९ आहे. इच्छुकांनी आपले परीपूर्ण भरलेले अर्ज सादर करावेतअसे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, वाशिम यांनी केले आहे.