इंडियन ऑईलच्या सामाजिक दायित्वातून आज दिव्यांगाना मिळणार सहायक उपकरणे

0
10

वाशिम, दि. 18 : जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींना लागणारी सहायक उपकरणे निशुल्क स्वरुपात देण्याचे काम इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आपल्या सामाजिक दायित्वातून पार पाडणार आहे. आज 19 जून रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणात सहायक उपकरणे वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून केंद्रिय मनुष्यबळ विकास, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री संजय राठोड, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, उर्जा,पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, राज्य शिक्षण सल्लागार परिषदेचे उपाध्यक्ष आमदार श्रीकांत देशपांडे, जिल्हा परिषद अध्यक्षा हर्षदा देशमुख, खा. भावना गवळी, आ. गोपीकिसन बाजोरिया, आ. लखन मलिक, आ. राजेंद्र पाटणी, आ. अमित झनक यांची तर जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना व इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे उपमहा प्रबंधक पी.के.सकलेचा हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.