प्रलंबित मागण्यांसाठी विज्युक्टाचे निवेदन

0
13

भंडारा,दि.19ः-शिक्षण आणि शिक्षकांच्या आश्‍वासीत मागण्यांच्या पुर्ततेसाठी पुढाकार घेऊन सभागृहात चर्चा घडवून आणावी या इतर मागण्यांचे निवेदन विज्युक्टाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. निवेदन देताना जिल्हा सचिव प्रा. राजेंद्र दोनाडकर, प्रा. उमेश सिंगनजुडे, प्रा. कोहपरे, प्रा. हटवार, प्रा. माकडे, भदाडे, राजेंद्र मेर्शाम, कापगते, आत्राम, कुरूडकर, मोदनकर, फटे, दमाहे, कांबळे, निनावे, शहारे, ठाकरे, राघोर्ते, बेहरे, कापगते वैद्य, नाकाडे उपस्थित होते.
दि. १ नोव्हेंबर २00५ पूर्वीनियुक्त असनूसुद्धा अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तरांना जुनी पेंशन योजना लागू न केल्याने त्यांच्यावरील अन्याय दुर करावा, सेवेत दाखल झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तरांना जुनी पेंशन योजना लागू करा, मुल्यांकन पात्र उच्च माध्यमिक शाळांच्या प्रचलित अनुदान सुत्र त्वरित लागू करा, इतर कर्मचार्‍यांप्रमाणे १0, २0 व ३0 वर्षाच्या सेवेनंतरची आश्‍वासित प्रगती योजना शिक्षकांना लागू करा, राज्याच्या अभ्यासक्रम राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रमाच्या समक्ष करून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात होणारा भेदभाव संपुष्टात आणा तसेच स्वअर्थसहायित शाळा व महाविद्यालयांना मान्यता देणे बंद करा, या समस्यासंदर्भात पुढाकार घेऊन सभागृहात चर्चा घडवून आणावी व शिक्षण- शिक्षक आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.