अर्जूनी/मोर तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुक प्रक्रिया सुरू

0
56

एक सरपंच तर २१ ग्रामपंचायत सदस्य निवड
अर्जूनी/मोर,दि.१९– अर्जूनी/मोर तालुक्यात एक सरपंच व २१ ग्रामपंचायत सदस्य निवडणुक कार्यक्रम जाहिर झाला आहे. नामनिर्देशन प्रक्रिया सुरु झाली आहे. निवडणुक असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आर्दश आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
यामध्ये प्रामुख्याने गौरनगर ग्रामपंचायत ३ सदस्य.अरुणनगर ग्रामपंचायत २ सदस्य व सरपंच.दिनकरनगर ग्रामपंचायत २ सदस्य.जाणवा ग्रामपंचायत १ सदस्य.महागाव ग्रामपंचायत ७ सदस्य.बोंगगाव/सुरबन ग्रामपंचायत १ सदस्य.गुढरी ग्रामपंचायत १ सदस्य तसेच प्रतापगड.बोंडगावदेवी.नवेगावबांध.कुंभीटोला या ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी एक सदस्य पदाची निवडणूक होणार आहे.
उमेदवारी अर्ज सादर करणे १९ जून असून .नामनिर्देशन पत्राची छाननी २० जून असून २२ जूनला उमेदवारांना चिन्ह वाटप होणार आहेत तर ५ जुलैला सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपावेतो मतदान होणार असून ६ जुलैला मतमोजणी होईल.महागाव.अरुणनगर.दिनकरनगर या ग्रामपंचायतींसाठी एम.एच.मूनेश्वर व एस.बी गौरकर.तर प्रतापगड.बोंडगावदेवी.नवेगावबांध.कुंभीटोला या ग्रामपंचायतींसाठी आर.पी. रामटेके व एस. सी. हरिणखेडे तर गौरनगर.जाणवा.बोंडगाव सुरबन.गुढरी या ठिकाणी सि.बी.सिंधराम व आर.आर.कनोजकर यांची अनुक्रमे निवडणूक अधिकारी व सहाय्यक म्हणून काम करीत आहेत. निवडणु क निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार विनोद मेश्राम व नायब तहसिलदार सुनील भानारकर काम करीत आहेत