मुख्य बातम्या:

नागनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी किती आंदोलने करावी?

पवनी,दि.१९ : जिल्ह्याची प्राणहिता समजली जाणाऱ्या वैनगंगा नदीतील पाणी नागनदीच्या घाण पाण्यामुळे अशुद्ध झाले आहे. त्यामुळे मानवी जीवनासह पशुप्राणी व जलचर प्राण्यांसाठीही वैनगंगेचे दूषित पाणी धोकादायक झाले आहे. आता नागनदीचे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी अजून किती आंदोलने होणार, त्यासाठी शासन प्रशासनाने याची त्वरित दखल घेवून नागनदीचे पाणी दुसरीकडे वळवावे, अशी मागणी भंडारा जिल्ह्यातील सभ्य नागरिकांकडून केली जात आहे. आता दि. १९ जून २०१९ पासून अर्ध दफन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवाशक्ती संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.
भंडारा जिल्ह्यातील संजीवनी असलेली वैनगंगा नदीचे पाणी दुषित होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांना दुषित पाणी पेणे भाग पडत आहे. त्यासाठी २००९ पासून शासनाचे लक्ष वेधन्यासाठी येथील युवाशक्ती संघटनेच्या वतीने विविध मोर्चे व आंदोलने करण्यात आले परंतू संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासन आश्वासनाची खैरात शिवाय काही उपाययोजना न झाल्यामुळे अजून किती आंदोलन करावे लागेल असे प्रश्न उपस्थित होत आहे. पवनी तालुक्यात हजारो हेक्टर शेतीला वरदान ठरणारा गोसे खुर्द प्रकल्प बांधण्यात आले आहे. ह्या प्रकल्पात २००९ पासून पाणी साठविणे सुरू आहे. धरणामध्ये नागपूर शहरातील मलमुत्र युक्त सांडपाणी कोणतीही प्रक्रीया न करता कन्हान नदी मार्गे वैनगंगा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. ते दुषित पाणी धरणात येवून जमा होते. दररोज सुमारे ४२० दशलक्ष लिटर प्रतिदीन प्रदुषित पाण्याचा साठा धरणात येतो. धरणातील पाण्यात विषारी द्रव्याचे घटक प्रमाण वाढले असून पाण्यामधील आॅक्सीजनचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. त्यामुळे मासे उत्पादनावर सुद्धा मोठा परिणाम झाला आहे. धरणातील संपूर्ण पाणी काळ्या रंगाचा झालेला असून दुर्गंध युक्त आहे. आता तेच पाणी तालुक्यातील जनतेला पेणे भाग पडत आहे. त्यामुळे गॅस्ट्रो, कावीळ आदी अनेक रोगांचा प्रभाव अनेक वषार्पासून होत आहे. मानव, शेती, वृक्ष, प्राणी व पर्यावरणावर याचा विपरित परिणाम होत आहे. परंतू या सर्व बाबीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून जीवनमाना सोबत खेळत असल्याने १९७४ च्या जलकायदा नुसार संबंधित विभागावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. शासनविरोधी धोरणामुळे वैनगंगा नदीच्या पाण्यात सोडणारे नागनदीवर जलसुद्धीकरण यंत्र बसवून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी पून्हा युवाशक्ती संघटनेने पुढाकार पुकारले असून दि.१९ जून ला दुपारी ३ वाजता पासून अर्धदफन आंदोलन पूकारण्यात आले असून या आंदोलनात शेकडाच्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत देवराज बावनकर, दिपक बावनकर, प्रशांत मोहरकर, गोपाल काटेखाये, प्रकाश पचारे, रमेश शिवरकर आदींनी केली आहे.

Share