मुख्य बातम्या:

२२ जूनला सडक/अर्जुनी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नविन इमारतीचे उद्घाटन

गोंदिया,दि.२०: : २२ जून रोजी सकाळी १०.३० वाजता सडक/अर्जुनी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नविन इमारतीचे उद्घाटन उच्च न्यायालय मुंबई, नागपूर खंडपीठ, नागपूरचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास सडक/अर्जुनी तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सडक/अर्जुनी येथील तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.राजेंद्र लंजे आणि दिवाणी न्यायाधीश एन.आर.ढोके यांनी केले आहे.

Share