अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना २९ जूनपर्यंत अर्ज आमंत्रित

0
72

गोंदिया,  दि.20: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत मांग, मातंग, मांग गारुडी, मांग गारोडी व इतर तत्सम १२ पोटजातीतील ज्या विद्यार्थ्यांना वर्ष २०१८-१९ मध्ये दहावी, बारावी, पदवी, पदविका, अभियांत्रिकी व वैद्यकीय या परीक्षेत ७० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले असतील अशा विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार व उपलब्ध निधीनुसार जिल्हानिहाय शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.
तरी संबंधित जातीतील ज्या विद्यार्थी/विद्यार्थीनींना ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले असतील अशा विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, मार्क शीट, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, बोनाफाईड प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड व दोन पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी आवश्यक कागदपत्रासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पतंगा मैदान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, गोंदिया येथे २९ जून २०१९ पर्यंत अर्ज सादर करावे. असे जिल्हा व्यवस्थापक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), गोंदिया यांनी कळविले आहे.