मुख्य बातम्या:

ऑनलाईन व ऑफलाईन दोन्हीत अर्ज करणाèया शिक्षकामुळेच इतरावंर अन्याय

विस्थापीत यादीतील शिक्षकांच्या ऑनलाईन बदली करतांनाही घोळ
गोंदिया,दि.२० : महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागांतर्गत राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या करिता एन आय सी पुणे मार्फत बदली पोर्टल सुरू केले. सन २०१७-१८ या वर्षापासून सुरू झालेला बदली पोर्टल राज्यात वादात्मक ठरला आहे व कितीतरी याचिका कोर्टात दाखल करण्यात आल्या परंतु न्यायालयानेही शिक्षकांना न्याय दिला नाही.त्यातच यावर्षीच्या बदल्यामध्ये सुध्दा चांगलाच घोटाळा झालेला आहे.स्थानिक पातळीवर शिक्षण विभागाचा जो कर्मचारी बदली पात्र यादी तयार करण्याचे काम ऑनलाईन करतो त्याच्याही कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे.
या बदलीप्रकियेतील रॅण्डमप्रकियेत पती पत्नी एकत्रीकरणातंर्गत शिक्षकांना बदलीसाठी पंचायत समिती स्तरावर अर्ज जिल्हा परिषदेच्यावतीने मागविण्यात आले होते.ज्या शिक्षक-शिक्षिकांनी यासाठी अर्ज केले,त्यांनी ऑनलाईन बदलीकरीता अर्ज करायला नको होते,परंतु काहींनी अर्ज केल्याने त्यांच्या बदल्या झाल्या,त्या बदल्या सुध्दा त्यांच्या सोयीनुसार झाल्याने या प्रकियेवरच शंका निर्माण झाली आहे.एकत्रीकरणासाठी व ऑनलाईन या दोन्ही प्रकियेत अर्ज केल्याने ते शिक्षक विस्थापीत यादीत आले.परंतु या विस्थापीत यादीतील काही शिक्षकांची ऑनलाईन बदली झाल्याने इतरांवर अन्याय झालेला आहे.
यामध्ये देवरी पंचायत समिती देवाटोला शाळेतून सुरेश नै.पटले यांची बदली तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथे झाली.यांचे नाव विस्थापीत यादीमध्ये ५ व्या क्रमांकावर आहे. (यांची पत्नी जिल्हा परिषदेच्या एका विभागात मुख्यालयात कार्यरत आहे),सालेकसा पंचायत समितीच्या सातगाव शाळेतून प्राजक्ता प्रल्हाद रणदिवे यां गोंदिया पंचायत समितीच्या पारडीबांध शाळेत आल्या.यांचे नाव विस्थापीत यादीमध्ये ६ व्या क्रमांकावर आहे. (यांचे पती हे गोंदियात कोषागार कार्यालयात नोकरीवर आहेत),अर्जुनी मोरगाव पंचायत समितीतील पांढरवाणी रैय्यत शाळेच्या मंदा चंद्रकुमार कोसरकर यांची बदली गोरेगाव पंचायत समितीतल कमरगाव येथे करण्यात आली, यांचे नाव विस्थापित यादीत १४ व्या क्रमांकावर आहे.(यांचे पती हे सालेकसा पंचायत समितीतील हलबीटोला येथे प्राथमिक शिक्षक आहेत आणि ते पत्नीपेक्षा सेवा काळात वरिष्ठ असल्याने त्यांची बदली आधी होणे अपेक्षित होती परंतु ११ महिने कार्यकाळ असलेल्या पतीपेक्षा ४ महिने सेवाकाळ आहे.),अर्जुनी मोरगाव पंचायत समितीतील अरुणनगर येथील अरुणा देशलाल मंडीया यांची बदली गोंदियातील तेढवा येथे करण्यात आली,त्यांचे विस्थापीत यादीतील क्रमांक २८ आहे.अशा विस्थापीत यादीतील शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या कुठल्या निर्णयाने झाल्या अशा प्रश्न उपस्थितीत झालेला आहे.जेव्हा २६ मे २०१९ च्या शासन निर्णयानुसार ज्या शिक्षक शिक्षिकेचा सेवाकाळ सर्वाधिक त्या शाळेत असेल त्याचीच बदली आधी करायचे आहे.परंतु मंदा कोसरकर यांच्या कार्यकाळापेक्षा त्यांचे पती चंद्रकुमार कोसरकर यांचे कार्यकाळ शाळेतील अधिक असतानाही त्यांची बदली न करता श्रीमती मंदा कोसरकर यांची झालेली बदलीच नियमबाह्य झालेली आहे असे अनेक घोळ बदल्यामध्ये शिक्षण विभागाचे प्रमुख,ऑपरेटर व त्यांच्यासोबतच्या कर्मचाèयांनी मिळून केल्याने अनेक शिक्षकावंर अन्याय झालेला आहे.
सोबतच शिक्षण विभागाने पती पत्नी शिक्षक-शिक्षिकेंच्या एकत्रीकरणाला प्राधान्य देण्याएैवजी त्यांनी पती शिक्षक तर पत्नी इतर विभागात qकवा पती इतर विभागात तर पत्नी शिक्षिका अशांच्याच एकत्रीकरणात बदल्या केल्याचे दिसून येत आहे.यावेळची झालेली प्रकिया सुध्दा अन्यायकारक असून बदली झालेल्या शिक्षकांना मात्र तातडीने रुजु होण्याचे दिलेले आदेश गैरप्रकार लपविण्यासाठी व शिक्षणाधिकारी व त्यांच्या चमूने केलेली चूक लपविण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
वादाच्या भोवèयात असलेल्या बदली पोर्टल मार्फत सत्र २०१८-२०१९ ला पुन्हा सुरू करण्यात आले. गोंदिया जिल्हा परिषदेत जिल्हांतर्गत बदली करिता बदली पात्र शिक्षकांची यादी, रिक्त पदांची यादी, समानीकरण याची यादीची यादी दिनांक ७ जून २०१९ ला प्रकाशित करण्यात आली व दिनांक ८ जून २०१९ ला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगीन वरून बदली पोर्टल सुरू करून शिक्षकांना बदली करीता २० शाळांच्या पसंतीक्रम घालण्याकरिता मुभा देण्यात आली व बदलीपात्र शिक्षकांनी पोर्टल वर आपली माहिती ७ जून २०१०९ ला प्रकाशित करून रिक्त पदानुसार आपला पसंतीक्रम दाखल केला. जिल्ह्यातील शिक्षकांची सर्व माहिती अपलोड झाल्यानंतर दिनांक ११ जून ला रात्री १२ वाजता पोर्टल बंद करण्यात आले. ११ जून रोजी बदली पोर्टल बंद केल्यानंतर दिनांक १४ जून रोजी जिल्हा परिषदेमार्फत रात्री पुन्हा बदली पोर्टल सुरू करून दिनांक ७ जून २०१८ ला प्रकाशित केलेल्या रिक्त पदांच्या यादीतील २८ जागा कमी करण्यात आल्या व पुन्हा पोर्टल बंद करण्यात आले यामुळे बदलीपात्र ५३७ शिक्षकांनी दिनांक ८ ते ११ जून २०१९ या कालावधीत या २८ जागांना आपला पसंतीक्रम दर्शविला होता त्यांची दिशाभूल करण्यात आली यामुळे गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा अनागोंदी व भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत आहे नेहमी वादाच्या भोवèयात असलेली बदली प्रक्रयेमुळे जिल्ह्यातील शिक्षकावर विस्थापित होण्याची पाळी येईल करिता गोंदिया जिल्ह्यातील बदली प्रक्रया रद्द करण्यात यावी किंवा समानीकरण याच्या राखून ठेवलेल्या जागा खुल्या करण्यात येऊन सर्व शिक्षकांना पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांच्या लॉगिन वर फार्म भरून पसंतीक्रम भरण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Share