मुख्य बातम्या:

प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे हाच आपला ध्येय-आ.अग्रवाल

गोंदिया,दि.२० : आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा असून आरोग्य सेवेचे जाळे अधिक बळकट करुन मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आपण सदैव प्रयत्नरत राहणार आहोत. देश आणि समाजासाठी प्रत्येक व्यक्ती महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्ती निरोगी राहिल्यास देश आणि समाज तंदूरुस्त राहिल. त्यासाठीच प्रत्येक गावातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आपले प्रयत्न आहे. याच दृष्टिकोनातून गोंदिया तालुक्याचा केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेत समावेश करण्यात आल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील रजेगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर व येथील ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रियेच्या सेवेला मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला.यावेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, जि.प.सभापती रमेश अंबुले, लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, गेंदलाल शरणागत, विजय लोणारे, रजनी गौतम, प्रकाश डहाट, प्रमिला करचाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.व्ही.एम.चौरागडे, गमचंद तुरकर, टेकचंद सिंहारे, अंकेश हरिणखेडे, जे.सी.तुरकर, सूर्यप्रकाश भगत, नरेंद्र चिखलोंढे, ईश्वर पटले, किशोर वासनिक, चिंतामन चौधरी, वाय.पी.रहांगडाले, अनिल नागपुरे, लक्ष्मण तावाडे, केशव तावाडे, सुरज खोटोले, संतोष घरसेले, टिकाराम भाजीपाले, सावलराम महारवाडे, अशोक मेंढे, रघुजी येरणे,भाऊदास येरणे, सुरेश उपवंशी, देवेंद्र मानकर, जाकीर खान, सचिन डोंगरे, श्याम कावरे, तपेश सोनवाने उपस्थित होते. आ. अग्रवाल म्हणाले गोंदिया तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी १०८ रुग्णवाहिकेची सेवा, ५६ आरोग्य उपकेंद्रामध्ये डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे या भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यास मदत झाली आहे. प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील सिवनी, लोहारा, तुमखेडा खुर्द, फुलचूरपेठ, बाजारटोला, पिंडकेपार, घिवारी, चांदनीटोला, खळबंदा, मोगर्रा येथे नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्राना शासनाची मंजुरी मिळाली असून लवकरच या ठिकाणी ही आरोग्य उपकेंद्र सुरू केली जातील असे सांगितले. रमेश अंबुले म्हणाले, आ.गोपालदास अग्रवाल यांच्या माध्यमातून तालुक्यात सर्वच क्षेत्रात विकास कामे सुरू असून त्यामुळेच या परिसराचा कायापालट झाल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा मार्गदर्शन केले.

Share