चौहान स्पोर्ट्स अकॅडमीचे तायक्वांडो स्पर्धेत सुयश

0
14
सालेकसा,दि.27ःःआंतरराष्ट्रीय ऑलम्पिक दिनाच्या निमित्ताने आयोजित 3 र्या TAFTYGAS राष्ट्रीय युथ गेम – २०१९ तर्फे  तुमसर येथे झालेल्या 3 दिवसीय स्पर्धेत सालेकसा येथील चौहाण स्पोर्टस अकादमीने सुयश मिळविले आहे.सदर स्पर्धेत कब्बडी, बॅडमिंटन, क्रिकेट, बास्केटबॉल, फुटबॉल, लांब उडी, उंच उडी, जुडो, कराटे इत्यादी खेळाचे आयोजन स्पर्धेदरम्यान करण्यात आले होते. महाराष्ट्र सोबत छत्तीसगड, तेलंगाणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यातून आलेल्या ८०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
चौहान स्पोर्ट ऍकॅडमी तर्फे 6 स्पर्धकांनी भाग घेतला. त्यात सर्व विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक पटकावले.सालेकसातील गोल्डी भाटिया ह्यांनी तायक्वांडो स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावत सुवर्ण पदक पटकावला.सोबतच सालेकसा येथील शाक्षी शिवणकर, वैष्णवी वालथरे, मंगला गौतम, प्रनवी प्रधान विद्या नागपुरे ह्या मुलींनी सुद्धा सुवर्णपदक पदक पटकावले. पुढच्या महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्व सहभागी होऊन भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.सर्व विजेत्यांनी आपल्या विजयाचे श्रेय आई वडिलांना दिला आहे. चौहान स्पोर्ट्स अकॅडमी, जिल्हा मुख्य प्रशिक्षक दुलीचंद मेश्राम, नरेश बोहरे, आकाश पटले, दिनेश सोनवाने, ब्रजभूषण बैस राहुल हटवार ह्यांनी शुभेच्छा दिल्या.