खजरी विद्यालयात मानव विकास कार्यक्रमातंर्गत सायकलचे वितरण

0
24

सडक अर्जुनी,दि.30ः-तालुक्यातील आदिवासी विकास हायस्कूल व कला,विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी/डों.येथील विद्यार्थीनीना मोफत सायकलचे वितरण मानव विकास कार्यक्रमातंर्गत करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगत कल्याण शिक्षण संस्था साकोली चे सचिव एन.एन .येळे होते.विशेष पाहूणे म्हणून संस्था सहसचिव विमलताई रंहांगडाले उपस्थित होत्या.
याप्रसंगी प्राचार्य खुशाल कटरे,उपप्राचार्य बी.आर.देशपांडे,पर्यवेक्षक आर.के.कटरे,कनिष्ठ महाविद्यालय प्रभारी प्रा .वाय.टी.परशुरामकर,जिल्हा परीषद गोंदियाच्या माजी उपाध्यक्षा छायाताई चौव्हाण
विचार मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य खुशाल कटरे यांनी सादर करतांना महाराष्ट्र शासनाच्या मानव विकास कार्यक्रमातंर्गत दरवर्षी विद्यार्थीनीना मोफत सायकल देण्यात येत असून तालुक्यातील इतर शाळांच्या तूलनेत सर्वात जास्त विद्यार्थीनीना या योजनेचा लाभ मिळतो असे सांगितले.संचालन सहाय्यक शिक्षक जी टी लंजे यांनी तर आभार प्रा.वाय.टी.परशुरामकर यांनी मानले.

खजरी उच्च माध्य.विद्यालया चे उपप्राचार्य बी.आर.देशपांडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार
स्थानिक आदिवासी विकास हायस्कूल व कला,विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी/डों येथे उपप्राचार्य पदावर कार्यरत बी.आर देशपांडे यांचा शनिवार 29 जून रोजी सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगत कल्याण शिक्षण संस्था साकोली चे सचिव एन.एन .येळे होते.विशेष पाहूणे म्हणून संस्था सहसचिव विमलताई रंहांगडाले उपस्थित होत्या.
याप्रसंगी प्राचार्य खुशाल कटरे,सेवानिवृत्त सत्कारमुर्ती उपप्राचार्य बी.आर.देशपांडे,पर्यवेक्षक आर.के.कटरे,कनिष्ठ महाविद्यालय प्रभारी प्रा .वाय.टी.परशुरामकर,माजी शिक्षण सभापती व शिक्षिका छायाताई चौव्हाण विचार मंचावर उपस्थित होते.प्रास्तविक प्राचार्य खुशाल कटरे यांनी,संचालन जी.टी लंजे व प्रा .सुरज रामटेके यांनी केले तर आभार प्रा.वाय.टी.परशुरामकर यांनी मानले
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यानी परीश्रम घेतले.