ताफ्यातील आजारी कर्मचाèयांची काळजी घेणारे मंत्री

0
16

गोंदिया,दि.०७ः-राज्याचे सार्वजनिक बांधकाम,वन व आदिवासी विकास राज्यमंत्री तसेच भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.परिणय फुके हे भंडारा येथील आपले नियोजित कार्यक्रम आटोपून रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास परत येत असताना त्यांच्या ताफ्यातील एका वाहनातील कर्मचाèयाची प्रकृती खालावल्याचे कळले.अन मंत्री फुके यांनी लगेच त्या वाहनाच्या चालकाला सडक अर्जुनीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.अचानक रात्रीला रुग्णालयात मंत्रीमहोदयांचा ताफा पोचल्याने रात्रड्युटीवर असलेल्या वैद्यकिय अधिकाèयांचीही भंबेरी उडाली होती.छातीत दुखत असलेल्या वाहनचालकाच्या चेहèयावरील तळमळ बघून डॉ.फुकेनी मात्र रुग्णालयातील डॉक्टरांना त्यांच्या पध्दतीने उपचार करु दिले.त्यानंतर सदर वाहनचालकाला गोंदियातील बाहेकार यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून सध्या त्या वाहनचालकाची प्रकृती स्थिर आहे.
पालकमंत्री फुके यांनी कुठलाही मंत्रीपणाचा रुबाब न दाखविता आधी त्या वाहनचालकाला उपलब्ध प्राथमिक उपचार करुन घेण्यास सांगितले नव्हे तर तब्बल दीड तास ते त्या रुग्णालयात वाहन चालकाच्या प्रकृतीची काळजी घेत बसले.या दरम्यानच ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारीसह वाहनचालकही एक मंत्री सुध्दा सर्वसामान्यासारखे वागत असून त्यांच्या सामान्य नागरिकाप्रतीच नव्हे तर आपल्या सोबत असलेल्या सर्वांप्रती असलेला जिव्हाळा हा त्यांच्या यावेळी बघावयास मिळाले.वाहनचालकाने तर आपण आपल्या आयुष्यात कधी अशा जनप्रतिनिधी बघितला नसल्याचा उल्लेख उपचारादरम्यान केला.