चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त

0
14
file photo

रायपूर(वृत्संस्था) दि.०९ : छत्तीसगडमधील सुकमा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज मंगळवारी (९ जुलै) चकमक झाली आहे. या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. नक्षलवाद्याकडील शस्त्रसाठा जप्त केल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी डब्बाकोंटा परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला. अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईनंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.डब्बाकोंटा परिसरात नक्षलवाद्यांचे काही म्होरके लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शोधमोहीम हाती घेतली. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे तर इतरही काही नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेला दोन दिवसांपूर्वी मोठे यश मिळाले होते. छत्तीसगडमधील धामतरी येथे पोलीस स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले होते. चारही नक्षलवाद्यांचे मृतदेह जप्त करण्यात आले असून, मृत नक्षलवाद्यांकडून शस्त्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. धामतरी येथे पोलीस स्पेशल टास्क फोर्स आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीस सुरुवात झाली होती. यावेळी जवानांनी हा हल्ला धैर्याने परतवून लावत चार नक्षलवाद्यांना ठार केले होते.