प्रदर्शनातून मांडला आधुनिक भारताचा इतिहास

0
68

चेंबूर,दि.०९ःः नालंदा एज्युकेशनल फाऊंडेशन संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य विज्ञान आणि सेल फायनान्स महाविद्यालय चेंबूर येथे एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या कला शाखेच्या इतिहास विभागाच्यावतीने आधुनिक भारताचा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास 1857 ते 1947 अधिक विस्तृतपणे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी एक छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

सदर प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेच्या संचालिका सोनाल शेंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य नितीन कदम उपप्राचार्य एम सक्तीवेल आणि शिक्षक प्रमुख प्रा. विनोद गाडे हे उपस्थित होते प्रदर्शनात भारताच्या स्वातंत्र्याचा लढा क्रांतिकारी चळवळ वृत्तपत्रांची कामगिरी तसेच स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाच्या घटना महत्त्वाच्या व्यक्तींची दुर्मिळ छायाचित्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. तसेच इतिहास विभागातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना यावेळी माहिती देखील दिली.

या प्रदर्शनात तृतीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी माहितीचे बनवलेले तक्ते ठेवण्यात आले होते. या तक्त्यांच्या माध्यमातून छायाचित्र व त्यांची माहिती अधिक सविस्तरपणे विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. तसेच कला शाखेतील विद्यार्थ्यांनी इतर शाखेच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि इतर कर्मचाऱ्यांना ज्यांना इतिहासाबद्दल माहिती नव्हती त्यांना ती माहिती समजावून सांगितली. इतिहास विभागाच्या प्रमुख प्राध्यापक आरती भानावत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व प्रमुख पाहुण्यांना सदर प्रदर्शनाबद्दल सविस्तर माहिती दिली. विभागाचे इतर शिक्षक प्राध्यापक वैशाली राजे, प्राध्यापक श्रीकांत कुलकर्णी प्राध्यापक उज्वला म्हात्रे यांनी ही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच या प्रदर्शनासाठी परळच्या एमडी महाविद्यालयाचे प्राध्यापक सुशांत भोसले यांचेही सहकार्य लाभले या प्रदर्शनात महाविद्यालयातील सर्व विभागातील शिक्षक-विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. या प्रदर्शनाला 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली.