मुख्य बातम्या:

खजरीच्या आदिवासी विकास हायस्कुलमध्ये वृक्षारोपण

सडक अर्जुनी,दि.13ः- तालुक्यातील खजरी येथील जगत कल्याण शिक्षण संस्था साकोली द्वारा संचालीत ‘आदिवासी विकास हायस्कूल व कला,विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय येथे आज 13जुलै रोजी पालक शिक्षक आमसभेनिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.अध्यक्षस्थानी प्राचार्य खुशाल कटरे होते.युवक मंडळ खजरी/डों.चे अध्यक्ष प्रशांत झिंगरे व त्यांच्या समुहातर्फे शाळेला विविध प्रजातीचे वृक्ष भेट देण्यात आले.त्यानंतर स्थानीक हरितसेना पथक,पालक,युवक मंडळ खजरीचे कार्यकर्ते शालेय विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्रित वृक्षारोपन करून वृक्षसंवर्धनाची सामूहिक शपथ घेतली.
यानतंर शालेय सभागृहात पालकांची वार्षिक आमसभा याचे आयोजन करण्यात आले.प्रास्ताविक प्रा.वाय.टी.परशुरामकर यांनी केले.सभेदरम्यान पालक सभेचे अध्यक्ष प्राचार्य खुशाल कटरे यांनी सत्र 2019-2020चे शालेय नियोजन सादर केले.पालकांच्या समस्यां सोडविण्यात आल्या तसेच विविध शालेय पालक शिक्षक समीतीचे गठण करण्यात आले.संचालन शिक्षक जी.टी.लंजे यांनी केले.
आभार प्रा.वाय.टी.परशुरामकर यांनी मानले.

Share