आदिवासी वसतिगृहातील अस्वच्छता बघून पालकमंत्र्यांनी घेतली अधिकाऱ्यांची झडती

0
18

भंडारा, दि.13 जुलै : आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह भंडारा येथे आज शनिवारला आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी भेट देऊन वसतीगृहाची पाहणी करून विद्यार्थांच्या समस्या जाणून घेतल्या.वसतीगृहा मधील अस्वच्छता दिसताच अधिकाऱ्यांची कानउघडणी केली . विद्यार्थ्यांशी चर्चा करून विविध विषयावर चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व समस्या त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. फुके यांनी अधिकाऱ्यांना दिले.तसेच २० मुलामागे १ संगणक असे संगणक कक्ष तयार करुन देण्याचे आश्वासन पालकमंत्री फुके यांनी विद्यार्थ्यांना दिले.यावेळी आदिवासी विकास अपर आयुक्त डॉ. संदीप राठोड, देवरीचे प्रकल्प अधिकारी चौधरी, जि.प.सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, नितीन कडव, वस्तीगृहाचे अधिक्षक माळी, उपस्थित होते.