मुख्य बातम्या:

१५ जुलैला पालकमंत्र्यांच्या हस्ते पंडीत दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ

गोंदिया,दि.१४ : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे १५ जुलै ते १४ ऑगस्ट या कालावधीमध्ये पंडीत दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान जिल्ह्यात राबवायचे नियोजित आहे. या अभियानाअंतर्गत पात्र कुटूंबांना शंभर टक्के शिधापत्रिका वाटप, पात्र लाभाथ्र्यांना शंभर टक्के धान्य वाटप व धूरमुक्त जिल्हा करण्यासाठी सर्व कुटूंबांना शंभर टक्के गॅस जोडणी देण्यात येणार आहे. १५ जुलै रोजी दुपारी १ वाजता पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
या अभियानाअंतर्गत पात्र कुटूंबांना शंभर टक्के शिधापत्रिका वाटप, सर्व शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप व सर्व कुटूंबांना गॅस जोडणी देणे हे उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याकरीता शिधापत्रिका नसलेल्या व गॅस जोडणी नसलेल्या कुटूंबांनी त्यांचे रास्तभाव दुकानदाराकडे उपलब्ध अर्ज प्राप्त करुन परिपूर्ण अर्ज भरुन विहीत कागदपत्रासह दुकानदाराकडे जमा करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

Share