इंधन दरवाढीच्या विरोधात तालुका काँग्रेसचे निवेदन

0
14

अर्जुनी मोरगाव,दि.14ः-पेट्रोल, डिझेलची दरवाढ कमी करुन जीएसटी कक्षात आणण्याची मागणी अर्जुनी मोर राष्ट्रीय किसान मजूर काँग्रेसने निवेदनातून तहसीलदारांमार्फत राष्ट्रपती व पंतप्रधानांना केली आहे. निवेदनानुसार, नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात डिझेल व पेट्रोलचे दर अनुक्रमे ४ व ५ रुपयाने वाढविण्यात आले आहे. कच्चा तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारभावाच्या तुलनेत देशातील इंधनाच्या किंमतीवर विविध कर लावून सर्वसामान्य व शेतकर्‍यांची लूट सुरु आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळे वाहतूक खर्च वाढून महागाई वाढत आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकरी वगार्ला बसत असून उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे इंधनावरील सर्व कर रद्द करुन जीएसटीच्या कक्षात आणून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना, किसान मजूर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष देवाजी कापगते, तालुका काँग्रेस अध्यक्ष भागवत नाकाडे, अजय नशिने, राजू पालीवाल, सुनील लंजे, संघदिप भैसारे, विनीत भालेराव, इंद्रदास झिलपे, सुभाष देशमुख आदी उपस्थित होते.