इंग्लंडला मिळाला पहिला वर्ल्ड कप,सुपर ओव्हरने ठरला विजेता

0
9

लॉर्ड्स(वृत्तसंस्था) – न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लडंने इतिहास घडवला आहे. अतिशय चुरशीच्या सामन्यात अखेर इंग्लंडने पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनचा खिताब मिळवला आहे. तत्पूर्वी वर्ल्ड कप 2019 च्या फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामना कुठलाही निकाल न लागता टाय ठरला होता. न्यूझीलंडने इंग्लंडला विजयासाठी 242 धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंड त्याचा पाठलाग करण्यात सुरुतीला अपयशी ठरत असल्याचे दिसून आला. परंतु, सामन्याला खरी रंगत शेवटच्या ओव्हरमध्ये आली. याच ओव्हरमध्ये इंग्लंडने सामना बरोबरीवर आणला. यानंतर शेवटच्या सुपर ओव्हरवर विजयाचा निर्णय सोपविण्यात आला. यामध्ये इंग्लडंला विजयासाठी 16 धावांचे आव्हान देण्यात आले. याच शेवटच्या संधीचे इंग्लंडने सोने केले.

याआधी भारत (२०११) आणि आॅस्टेÑलिया (२०१५) यांनी यजमान म्हणून विश्वविजेतेपद जिंकले होते. ऐतिहासिक लॉडर््स मैदानावर झालेल्या या रोमांचक सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र इंग्लंडने त्यांना ५० षटकांत ८ बाद २४१ धावांवर रोखले. यानंतर इंग्लंडलाही ५० षटकात २४१ धावांत गुंडाळून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. या वेळी इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १५ धावा फटकावल्या. न्यूझीलंडकडून या लक्ष्याचा पाठलाग करताना जेम्स नीशामने जबरदस्त फटकेबाजी करीत एका षटकारासह १३ धावा केल्या. या वेळी पहिला चेंडू जोफ्रा आर्चरने वाइड टाकल्याने किवींनी ५ चेंडूत १४ धावा केल्या. अखेरच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना मार्टिन गुप्टिल दुसरी धाव घेताना धावबाद झाला आणि पुन्हा एकदा बरोबरी झाली. मात्र सामन्यात इंग्लंडने सर्वाधिक चौकार मारले असल्याने त्यांच्या पहिल्या विश्वविजेतेपदाचे स्वप्न साकार झाले.