विधानसभा निवडणुकीकरिता बसपा कार्यकर्त्यांनी तयारी सुरू करावी : राजभर

0
24

गोंदिया,दि.१५ : : ओबीसी समाजाला ३४० कलम अंतर्गत ५२ टक्के आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये मिळाले पाहिजे, भारतीय जनता पार्टी दिलेले आश्वासन पाळत नसून भारतीय समाजासोबत धोकेबाजी करीत आहे. प्रत्येक विधानसभेकरिता ३ उमेदवारांचे पॅनल तयार करा, जो मजबूत असेल त्याला विधानसभेची उमेदवारी देण्यात येईल. मुस्लीम, ओबीसी समाजात भाईचारा निर्माण करून संघटन मजूबत करावे. याकरिता विधानसभा निवडणुकीकरिता बसपा कार्यकर्त्यांनी तयारी सुरू करावी, असे प्रतिपादन आ. रामअचल राजभर यांनी केले.

बहुजन समाज पार्टी गोंदिया जिल्ह्याचा कॅडर कॅम्प भवभूती रंगमंदिर गोंदिया येथे घेण्यात आला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसपाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुरेश साखरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश महासचिव जितेंद्र महेशकर, मंगेश ठाकरे, प्रदेश सचिव गोंडाणे, दिनेश गेडाम, पंकज वासनिक, जिल्हा प्रभारी पंकज यादव, नगरसेवक संकल्प खोब्रागडे, जिल्हाध्यक्ष दुरवारा भोयर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्नेहा गडपायले, संदीप आनंद, पराग महेंद्र, अजित ठवरे, अनिकेत भावे, अनिल मेश्राम, नेहा मेश्राम, श्वेता रामटेके, हितेश गजभिये, कैलाश बोरकर, आनंद मेश्राम, नंदू बारसे, अनिल बावणे, शिवदास साखरे, नुरलाल उके, विरू उके, कमल हटवार, अशोक अरखेल, गौसीया बाजी शेख, लोकेश यादव, मनोज सरोकर, मंदीप वासनिक, कुंदा गाडकिने, सविता उके आदींनी सहकार्य केले. .