संस्कार भारती तर्फे दिल्लीत खा.सुनील मेंढे यांचा सत्कार.

0
15

दिल्ली- संस्कृत भाषेच्या संवर्धनाचा उदात्त हेतु बाळगुन संस्कृत भाषेत खासदार पदाची शपथ घेणाऱ्या खासदारांचा दिल्ली येथे संस्कृत भारतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील मेंढे यांचाही संस्कृत भारतीने गौरव केला.

   संस्कृत भारतीच्या वतीने नवनिर्वाचित खासदारांना खासदारकीची शपथ संस्कृत मधून घ्यावी अशा आशयाचे निवेदन दिले होते. संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसार आणि संवर्धनाच्या दृष्टीने खासदारांकडून हि अपेक्षा करण्यात आली होती. दरम्यान लोकसभेतील ४५ खासदारानी संस्कृत भाषेतून शपथ घेतल्याचे समजते यात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खा. सुनील मेंढे हे सुद्धा आहेत. या सर्व खासदारांचा दिल्ली येथे अखिल भारतीय संकृत भारतीच्या वतीने सन्मान करण्यात आला. डॉ.हर्षवर्धन केंद्रीय मंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान व आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्रालय आणि भूगर्भ मंत्रालय, मा.प्रताप चंद्र सारंगी केंद्रीय राज्य मंत्री पशुसंवर्धन दुग्ध व मत्सव्यवसाय , मा. इंद्रेश कुमार  मार्गदर्शक मुस्लीम राष्ट्रीय मंच, प्रो.भक्तवत्सल संस्कृत भारतीचे अखिल भारतीय अधिकारी यांच्या सह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

 खा.मेंढे यांच्या प्रशस्तीपत्र देऊन गौरव कण्यात आला. संस्कृत भारतीच्या वतीने झालेला हा सन्मान माझ्या साठी बहुमोलाचा असल्याची प्रतिक्रिया खा.मेंढे यांनी दिली.