नवोदय विद्यालय : इयत्ता ६ वीची निवड चाचणी परीक्षा;प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरु

0
24

वाशिम, दि. १८ : येथील जवाहर नवोदय विद्यालय हे केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत चालविण्यात येते. हे विद्यालय संपूर्णतः निवासी स्वरूपाचे असून शैक्षणिक सत्र २०१९-२० या वर्षामध्ये इयत्ता ५ वीमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र २०२०-२१ या वर्षात इयत्ता सहावीमध्ये प्रवेशाकरिता जवाहर नवोदय विद्यालय येथे निवड चाचणी परीक्षा प्रवेशाचे अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यावर्षी हे प्रवेश अर्ज संपूर्णतः ऑनलाईन पद्धतीने भरले जाणार आहेत.

 यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. पालक हे अर्ज कुठूनही अपलोड करू शकतात. त्यासाठी पुढील काही बाबी आवश्यक आहेत. यामध्ये विद्यार्थी व पालकाची सही स्कॅन करून असावी. विद्यार्थ्यांचे फोटो जेपीजी फॉर्मेटमध्ये असावेत. इयत्ता ५ वी मध्ये शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र स्कॅन केलेले असावे. हे प्रमाणपत्र विद्यालयाच्या www.jnvwashim.gov.in या संकेतस्थळावर डाऊनलोड लिंकमध्ये उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज अपलोड करण्याचा कालावधी १५ सप्टेंबर २०१९ पर्यंत आहे. सदरील अर्ज अपलोड www.nvsadmissionclasssix.in या संकेतस्थळावर करावा. प्रवेश परीक्षा ११ जानेवारी २०२० रोजी जिल्ह्यात ठरलेल्या परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल. प्रवेश अर्ज भरण्यासाठी विस्तृत माहिती जवाहर नवोदय विद्यालयाच्या www.jnvwashim.gov.in तसेच www.nvsadmissionclasssix.in वर उपलब्ध आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय, वाशिम येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी कळविले आहे.