शालार्थ वेतन प्रणालीवर मुख्याध्यापकांची कार्यशाळा

0
14

गोंदिया,दि.19:-गोंदिया जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीन (17जुलै)फुलचूरस्थित फूंडे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात जुलै 2019 पासून प्रारंभ होणार्या शालार्थ वेतन प्रणाली विषयावर मुख्याध्यापक,पर्यंवेक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य रमेश तनवानी होते.
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक भविष्य निर्वाह व वेतन अधिक्षक कार्यालयाचे बरडे ,शिक्षकेत्तर संघटनेचे लिलाराम जसूजा,अनंत टेंभूरकर,भूमेश रंहागडाले,दिनेश लाटा, ढोक,मुख्या संघाचे कार्याध्यक्ष दुर्गाप्रसाद पटले ,विदर्भ मुख्या.संघाचे उपाध्यक्ष प्राचार्य राम धावडे,विदर्भ प्रतिनिधी कु.रजिया बेग,उपाध्यक्ष सी.जी.पाऊलझगडे,प्रदिप नागदेवे मार्गदर्शक प्राचार्य खुशाल कटरे ,जी.एम.येळे,धनराज धासनिक,पमेश रहांगडाले,ओमप्रकाश पवार,सौ.टी.एम.हूमे,श्रीमती बबिता भारद्वाज,सौ.स्नेहा कावळे उपस्थित होते.
याप्रसंगी शालेय वेतन प्रणालीवर प्रत्यक्षात संगणकीय प्रशिक्षणाची अनिवार्यता गृहित धरून वेतन पथकाने नियोजन करण्याचे निर्णय घेण्यात आले.सत्र 2018-2019च्या
जि.पी.एफ.स्लिप्स,डीसीपीएस स्लिप प्रलंबित आहेत.वेतन पथक कार्यालयात मनुष्यबळ कमी असल्यामुळे.तालुकानिहाय वेळापत्रक देण्यात येईल.त्यानुसार प्रत्येक शाळांनी आपल्या दप्तरातील नोंद वही नुसार वेतन पथक कार्यालयात संम्बधित लिपीकांनी उपस्थित होऊन नोंदी कराव्यात व स्लिप्स प्राप्त कराव्यात असे ठरले.प्रलंबीत वैद्यकिय देयके,सेवानिवृत्त कर्मचार्यांचे देयके,नापरतावा कर्ज प्रकरणे तात्काळ निकाली काढावे.कोणत्याही शाळेचे कर्मचारी दुसर्या शाळेत स्थानांतरीत झाल्यावर अटॅच,डिटॅजची कार्यवाही तात्काळ करावी,प्रत्येक महिण्याचे कर्मचारी वेतन प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेस होण्यासाठी वेतन पथक,जिल्हा कोषागार कार्यालय,जी.डी.सी.सी.बॅक गोंदिया यांनी सहकार्य करावे असे ठरले.प्रास्ताविक देवेंद्र मच्छिरके यांनी केले.आभार प्राचार्य खुशाल कटरे यांनी मानले.कार्यशाळेत जिल्ह्यातील मुख्याध्यापक व लिपीक वृंद सहभागी झाले.कार्यशाळेच्या यशस्विते साठी स्थानिक क.महा.चे संस्थापक गजेंद्र फूंडे,पाथोडे,नाईक बाबू यांनी सहकार्य केले.