अखेर नेरला उपसा योजनेतून पाणी सुरु..

0
11

पवनी,दि.19ःः तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून पावसाने दडी मारल्याने पिके करपू लागले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शेतकरी पऱ्हे जगविण्यासाठी धडपड करु लागले आहे.त्यातच गोसेखुर्द प्रकल्पातंर्गंतच्या नेरला उपसा सिंचन योजनेचे अधिकारी मात्र निद्राअवस्थेत असल्याने भारतीय किसान आघाडीचे किशोर पंचभाई, मोहन सुरकर, राजेंद्र फुलबांधे व भाजप विदेश समिती सदस्य मधुसूदन गवई यांनी सदर मुद्याला घेऊन निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करीत पाणी सोडण्याची मागणी केली.तसेच उपसा सिंचन अभियंता अमोल वैद्य व  शर्मा यांच्याशी चर्चा केली.त्या मागणीची दखल प्रशासनाने त्वरीत घेत नेरला उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला गेला.त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. या निर्णयापर्यंत प्रशासनाला नेण्याचा ज्या पदधिकार्यांने प्रयत्न केला त्यांचे अभिनंदन येथील परिसरातील शेतकऱ्यांने केले आहे.
डावा कालव्याचा संघर्ष पाहु जाता आमच्या नेरला उपसा सिंचनाकडे लक्ष द्याअशी मागणी भाजपाचे अमोल उराडे यांनी केली आहे.चर्चेच्यावेळी किशोर पंचभाई, मोहन सुरकर, राजेंद्र फुलबांधे, सुरेंद्र आयतुलवार, अमोल उराडे, अतुल मुलकनवार, मोहन घोगरे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार सुनील मेंढे बत चर्चा केल्यात्यानंतर पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.नेरला उपसा सिंचन योजनेतील अरथळे, रखडले कामकाज या विषयावर लवकरच खा.सुनिल मेंढेच्या पुढाकाराने संबंधित अधिकार्याची बैठक होणार आहे.