शारदा बडोले यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन शनिवारी

0
27

अर्जुनी मोर,दि.19 : युगंधर क्रिएशन्स तर्फे आयोजित शारदा राजकुमार बडोले यांच्या ‘भावसुमनांची ओंजळ’ या पहिल्याच कविता संग्रहाचे प्रकाशन २0 जुलै रोजी सायं. ६ वाजता वसंतराव देशपांडे सभागृह नागपूर येथे होणार आहे. यानिमित्त आयु. शारदा बडोले व माजी मंत्री आ. राजकुमार बडोले यांचे कवित्वातून साकार झालेल्या ‘युगंधर’ या ऑडियो अल्बममधील गाण्याचे सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे.
भावसुमनांची ओंजळ या कविता संग्रहाचे लोकार्पण भारत सरकारचे भूपृष्ठ वाहतूक, सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते होणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे, माजी मंत्री आ. राजकुमार बडोले, विश्‍वस्त वनराई फाउंडेशनचे गिरीष गांधी तथा शारदा बडोले प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.’भावसुमनांची ओंजळ’ हा आयुष्मती शारदा राजकुमार बडोले यांचा पहीलाच कविता संग्रह आहे.या प्रकाशन सोहळय़ाला अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन युगंधर क्रिएशन्सचे अनिकेत बडोले, प्रशांत शहारे यांनी केले आहे.