मुख्य बातम्या:

राज्यस्तरीय कीक बॉक्सींग स्पर्धेत अंजली बघेलेला सुर्वणपदक

गोंदिया,दि.१९ः- येथील श्री गुजराती राष्ट्रीय केळवणी मंडळाद्वारे संचालित श्रीमती जे.एम.व्ही.अंग्रेजी प्राथमिक शाळेची इयत्ता चौथीची विद्यार्थींनी अंजली प्रमोद बघेले हिने राज्यस्तरीय कीक बॉक्सिंग स्पेर्धत सुर्वण पदक प्राप्त करुन यश मिळविले.सोबतच ज्युनियर महिला कराटे स्पर्धेत ९ वर्ष वयोगटात ब्राँझमेडल मिळवित तिसरा क्रमांक पटकावल्याबद्दल शाळेच्यावतीने तिचे अभिनंदन करण्यात आले.अंजलीच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रफुल पटेल,उपाध्यक्ष दिपम पटेल,अजय वडेरा,सचिव जयेश पटेल,मुख्याध्यापिका रेणुका जडेजा,निलिमा साहू,मनिष माथरे,गीता खिरेकर आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share