नियोजन समितीच्या बैठकीवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांचा बहिष्कार

0
18

गोंदिया,दि.31-जिल्हा नियोजन समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित नियोजन समितीच्या ठराविक वेळेला हजर राहूनही पालकमंत्री डॉ.परिणय फुके सभेला अडीचतास उशिरा आल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार घालत जिल्हाधिकारी व नियोजन समितीच्या सचिवांकडे लेखी स्वरूपात निषेध नोंदविला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात  मंगळवारला जिल्हा नियोजन समितीची बैठक नवनिर्वाचित पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली होती.त्यासंबंधीचे पत्र सर्व सदस्यांनाही देण्यात आले होते,त्यानुसार सर्व सदस्य व राज्यमंत्रीचा दर्जा असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा मडावी या सुद्धा हजर झाल्या.सभागृहात १२ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादीचे सदस्यासह काही भाजपचेही सदस्य हजर होते.जिल्हा परिषद अध्यक्षा या मंचावर बसल्या असल्या तरी त्यांना बोलण्यासाठी स्पिकरची व्यवस्था जिल्हाप्रशासनाने केली नव्हती.दोनतासापासून हजर असलेल्या सदस्यांना चहा पाणी सुद्धा देण्यात आले नाही.व पालकमंत्री कधी येणार याची माहिती सुद्धा दिली गेली नाही.जेव्हा की दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहून पालकमंत्र्यांनी अधिकारीसह आढावा बैठक घेतली.त्यानंतर त्यांनी नियोजन समितीच्या सभेला न जाता नव्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला रवाना झाले.एकीकडे महत्त्वपूर्ण नियोजन समितीची बैठक असताना पालकमंत्र्यांना लोकार्पण महत्त्वाचा का वाटला असा प्रश्न काँग्रेस राष्ट्रवादीच्या सदस्यांनी उपस्थित करीत पालकमंत्री मनमानी करीत विरोधी पक्षांच्या सदस्यांना डावलण्यासाठीच अशा प्रकार केल्याची टीका केली आहे.नियोजन समितीच्या सभेला २.१५ वाजेपर्यंत पालकमंत्री व जिल्हाधिकारी हजर न झाल्यानेच बहिष्कार करीत असल्याचे जि.प.अध्यक्ष सीमा मडावी,सदस्य पी.जी.कटरे,प्रीती रामटेके, मनोज डोंगरे,लता दोनोडे,कैलास पटले, रमेश अंबुले,दिपकqसह पवार, विमल नागपुरे,दुर्गा तिराले,ललिता चौरागडे, रमेश चुर्हे, राजेश भक्तवर्ती,सरिता कापगते व विनितकुमार सहारे यांनी म्हटले आहे.