मनसेच्या शाखा गावागावात उघडण्याचा बैठकित निर्णय

0
47
गोंदिया,दि.01ः-येथील विश्रामगृहात आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया जिल्हा बैठकित जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे गठन करणे तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली.बैठकित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी पदाधिकार्यांच्या कानपिचक्या घेत गाव तिथे शाखा उपक्रम राबवून कार्यकर्त्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश दिले.बैठकिला जिल्हाध्यक्ष मनिष चौरागडे, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे,महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिलीप धोत्रे सह जिल्हा कार्यकारीणीचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी धोत्रे यांनी भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पक्षातर्फे ठोस आणि कायम उपाययोजना करण्यात येईल असे उपाय करावे. तसेच पदाधिकार्यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी आधी स्वतः सक्षम व्हावे असे विचार मांडले.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत विद्यार्थ्यांनी प्रवेश करत सालेकसा येथील तालुका कार्यकारणी आणि शहर कार्यकारिणीचे गठन करण्यात आले. मनविसे तालुका सालेकसाचे तालुका अध्यक्ष म्हणून स्वप्नील बोंबार्डे तर शहर अध्यक्ष म्हणून उमंग बंसोड ह्यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व शाखेचे अध्यक्ष, महिला सेना, विद्यार्थी सेना, वाहतूक सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.