मुख्य बातम्या:

व्यवसायातून वृक्षसंवर्धनाचा ध्यास; शारदा ऑटोमोबाईलचा उपक्रम

गोरेगाव,दि.0२ः- व्यवसाय हा केवळ नफा कमविण्यासाठी नसून व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक व निसर्गाची बांधलिकी जोपासण्याचा अनोखा उपक्रम येथील दुचाकी विक्रेता शारदा ऑटोमोबाईल्सचे संचालक सचिन पटले यांच्यातर्फे राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला तालुकावासीयांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पर्यावरण रक्षणासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहेत. त्याचाच एक भाग असलेल्या वृक्षारोपन व संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये, विविध सामाजिक संघटनांव्दारे वृक्षारोपन केले जाते. मात्र त्यांच्या संवर्धनाकडे सर्वांचेच लक्ष होत असल्याचे दिसते. परिणामी वृक्षलागवडीचा उद्देश यशस्वी होत नाही. हीच बाब हेरुन व व्यवसाय हा केवळ नफा कमविण्यासाठीच नसून या व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक व निसर्गाप्रतीचे कर्तव्याची जाणीव ठेवीत शारदा ऑटोमोबाईलचे सचिन पटले यांनी व्यवसायातून वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेतला आहे. गत तीन वर्षापासून पावसाळ्यात शारदा ऑटोमोबाईल्सतर्फे दुचाकीसाठी सात दिवसीय निःशुल्क चेकअ‍ॅप शिबीराचे आयोजन केले जाते. यात दुचाकी तपासणीसह दुरुस्ती, दुचाकी विक्रीवर सवलतही दिली जाते. दुचाकी दुरुस्ती, तपासणी qकवा नवीन दुचाकी घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना शारदा ऑटोमोबाईल्सतर्फे एक वृक्ष भेट देऊन त्याचे संवर्धन करण्याचे शपथपत्र लिहून घेतल्या जाते. या उपक्रमाला दुचाकीधारकांचाही उत्स्र्फूत सहकार्य मिळत असून पर्यावरण संरक्षणाकरीता वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती होत आहे. शारदा ऑटोमोबाईलच्या हा उपक्रम तालुकावासीयांमध्ये कौतुकाचा विषय ठरला आहे.

Share