महिलांबाबत वन स्टॉप योजनेसाठी अर्ज अमंत्रित

0
14

गडचिरोली : दि. 2 – गडचिरोली जिल्हयातील संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत One stop crises center ही योजना सी टाईप क्वॉर्टर नं. ४६, ४७ कलेक्टर कॉलनी, सोनापुर काम्प्लेक्स, गडचिरोली येथे सुरू करण्यात आलेली आहे. One stop crises center या योजनेच्या मार्गदर्शिकामध्ये दिल्याप्रमाणे (implementing agency) अंमलबजावणी करण्या-या संस्थांची निवड करावयाची आहे.

सदर आवेदन करणा-या संस्थेला अन्यायग्रस्त/संकटग्रस्त पीडित महिलांच्या (लिंग भेदभाव,हिंसाग्रस्त व लैंगीक अत्याचार पीडीत) हिताच्या क्षेत्रात काम करण्याचा ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. त्याच प्रमाणे प्रशिक्षण देणे, कर्मचारी क्षमता बांधणी व तांत्रिक मदत या क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.आवेदन करणा-या संस्थेच्या घटना नियमावलीमध्ये अन्यायग्रस्त/संकटग्रस्त पीडित महिलांसाठी कार्य करण्याचा उल्लेख असलेल्या संस्थेलाच आवेदन करता येईल. तसेच सदर कामाबाबत १० मिनीटाचे सादरीकरण करावे लागेल. कार्यलयीन कामकाजाच्या सात दिवसाचे आत विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक आहे. त्या कागदपत्रसह one stop crises center योजनेचा प्रस्तावासोबत दयावयाच्या कागदपत्रसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बॅरेक क्रमांक १, खोली क्रमांक २६, २७ कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे सादर करावा. विलंबाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. एजेन्सी निवडण्याचे सर्व अधिकार किंवा सदर प्रक्रिय कोणत्याही टप्यावर थांबविण्याचे अधिकार (Task force)कृती कार्य गट राखून ठेवत आहे. अधिक माहिती व विहित नमुन्यातील अर्जकरीता जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात संपर्क साधण्यात यावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.