मुख्याध्यापक संघाच्या शिष्टमंडळाने घेतली आ.गाणांराची भेट

0
17

गोंदिया,दि.03:- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातंर्गत येत असलेल्या जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक समस्याना घेऊन शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्याध्यापक संघाने चर्चा करीत निवेदन सादर केले.शिष्टमंडळासोबत गोंदिया जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी तत्पर असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. निवेदनात जिल्हा परिषद व्यवस्थापन गोंदियाने आर.टी.ई.कायदा वेशीवर टांगत ,अतंराच्या व पायाभूत सुविधांचा विचार न करता इयत्ता 5वी व इयत्ता 8 वी च्या अनाधिकृत तुकड्या सुरू करून अनैसर्गिक स्पर्धा निर्माण केली.परिणामतः अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या शाळेतील शिक्षक अतिरिक्त ठरत आहे.
जिल्हापरिषदेच्या या निर्णया च्या विरोधात मा.न्यायालय यांनी निर्णय दिलेला आहे.या पार्श्वभूमीवर अनाधिकृत तुकड्यां तात्काळ बंद करण्यात याव्यात व या पूढे अशा तुकड्या उघडण्यात येऊ नये.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या नियंत्रणात इयत्ता 1 ते 8च्या मोफत पुस्तकांचे वितरण मागील सत्राच्या पटसंख्येच्या आधारे शाळांना सत्र प्रारंभी झाले.सदोष वितरण पध्दती मुळे विहित संख्येएवढ्या पुस्तका संबधित शाळांना प्राप्त न होण्याची समस्या असून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी व्यक्तिगत लक्ष घालत कमी गेलेल्या पुस्तकांची पुर्तता तात्काळ करावी.जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने अनुसूचित जातीच्या मुलीना दरवर्षी मोफत सायकल खरेदी करण्यासाठी जि.प.शाळा सह अनुदान खाजगी शाळांनाही देण्यात यावा.गोंदिया स्काऊट व गाईड कार्यालय व भविष्य निर्वाह व वेतन पथक कार्यालय यांना नविन शासकिय ईमारत जयस्तंभ गोंदिया येथे स्थांनातरणास परवानगी द्यावी यांचा समावेश होता.शिष्टमंडळाचे नेतॄत्व जिल्हा मुख्या.संघाचे अध्यक्ष प्राचार्य रमेश तणवानी यांनी केले.शिष्टमंडळात प्राचार्य संदिप मांढरे,प्राचार्य भुपेंद्र त्रिपाठी,प्राचार्य बी.पी.बिसेन,मुख्याध्यापक ओमप्रकाश सिंह पवार,मुख्याध्यापक दिनेश बहेकार ,संस्थापक गजेंद्र फूंडे व इतर सहभागी होते.प्रास्ताविक व आभार ओ.एस.पवार यांनी केले.