मुख्य बातम्या:

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना नागपुरात पहाटे अटक

नागपूर,दि.03: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना शनिवारी पहाटे त्यांच्या निवासस्थानी अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान जनतेच्या प्रश्नांवर निदर्शने करण्याची शक्यता असल्याचे कारण असल्याची चर्चा आहे .दरम्यान या घटनेचा प्रदेश कांग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी निषेध नोंदविला आहे.
आपल्या या अटकेबाबत प्रतिक्रिया देताना लोंढे यांनी, मुख्यमंत्र्यांच्या दडपशाहीला विरोध करू नये म्हणून मला पहाटे अटक करण्यात आली, लोकांची घरे तोडून रस्ते बांधणे, डंपिंग यार्डमुळे लाखो लोकांना दमा झालाय त्याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला. शेतकऱ्यांची कर्जे माफ झाली नाहीत, बेरोजगारांना रोजगार नाही, मग हा कसला जनादेश असे ते पुढे म्हणाले.काँग्रेस पक्ष याचा निषेध करते. अशा पद्धतीने अटक करणे हा घटनात्मक हक्काचा संकोच आहे, इतके घाबरट सरकार कधीही पाहिले नाही. माझी अटक करून प्रश्न सुटणार असतील तर मी कायम तुरुंगात जायला तयार आहे असे ते पुढे म्हणाले. लोंढे यांना नंदनवन पोलीस ठाण्यात ठेवले आहे.

Share