60 हजार हून अधिक युवक होणार रोजगारी

0
14

कौशल्य विकास योजनेंतर्गत 1.75 लाख युवकांना प्रशिक्षण

नागपूर, दि. 5 : प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियानाअंतर्गत राज्यातील पावने दोन लाख युवकांना कौशल्य व उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यात आहले आहे. त्यापैकी 60 हजाराहून अधिका युवकांना रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त झाला आहे.
‘कुशल महाराष्ट्र- रोजगार युक्त महाराष्ट्र’ असे उद्दिष्ट ठरवून प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियानांतर्गत राज्यातील 15 ते 45 वयोगटातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतात. या अंतर्गत कौशल्य विकासासंबंधी अधिक मनुष्यबळ मागणीची 11 क्षेत्र निश्चित करण्यात आली आहेत.
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत मार्च 2020 पर्यंत दीड लाखांहून अधिक युवक,  युवतींना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून आतापर्यंत 10 हजारांहून अधिक युवक युवतींना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, युवक, युवतींना कौशल्य प्रशिक्षण, स्टार्ट अप यात्रा, स्टार्ट अप सप्ताहाचे आयोजन, महिलांना सशक्त करणारी हिरकणी महाराष्ट्राची योजना,आयटीआयचे बळकटीकरण, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत ‍प्रशिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी कर्ज असे काही महत्वाचे निर्णय कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने घेतले आहेत.