डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना;अर्ज करण्याचे आवाहन

0
19

वाशिम, दि. ०8 : डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता वसतिगृहाच्या सुविधा वाशिम शहरात उपलब्ध होण्यासाठी शासकीयस्थानिक संस्थामंडळे यांच्या मालकीच्या व विनावापर पडून असलेल्या इमारती नोंदणीकृत संस्थांना वसतिगृहासाठी देण्याची योजना आहे. या योजनेंतर्गत वसतिगृह चालविण्यासाठी नोंदणीकृत संस्थांनी आपले अर्ज व प्रस्ताव दोन प्रतीत ३० ऑगस्ट २०१९ पर्यंत प्राचार्यशासकीय तंत्रनिकेतनरिसोड रोडलाखाळावाशिम यांच्याकडे जमा करावेत.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या १३ जुलै २०१८ रोजीच्या शासन निर्णयातील अटी व शर्ती आणि सर्वसाधारण कार्यपद्धती नोंदणीकृत संस्थांची निवड करण्याकरिता लागू राहतील. प्राप्त अर्जामधील वसतिगृहाच्या इमारतीची गुणवत्ता तपासणी त्यानुसार करण्यात येईल. निवड केलेल्या नोंदणीकृत संस्थेस हे वसतिगृह चालविण्यासाठी कोणत्याही स्वरूपाचे अनुदान शासनाकडून देण्यात येणार नाही. वसतिगृहामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणाऱ्या शुल्कामधून वसतिगृहाचा सर्व प्रकारचा खर्च भागविण्याची जबाबदारी संबंधित नोंदणीकृत संस्थेची राहील. शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णयपरिपत्रकांनुसार वसतिगृहाचे व्यवस्थापन व विद्यार्थ्यांचे प्रवेश व इतर बाबी अंमलात आणणे बंधनकारक राहीलअसे प्राचार्यशासकीय तंत्रनिकेतनवाशिम यांनी कळविले आहे.