संवैधानिक अधिकारासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
13
सालई खुर्द :  गेल्या अनेक वर्षापासून केंद्रामध्ये लोधी समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ठ करण्यात यावे या मागणीला लोधी समाज १६ वर्षापासून आपल्या संवैधानिक अधिकारासाठी झटत आहे. याकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
लोधी, लोध, लोधा समाजाला महाराष्ट्र शासनाने २००५ साली ओबीसी च्या सुचिमध्ये समाविष्ट करण्यात आले, मात्र केंद्राच्या ओबीसी सूची मध्ये आतापर्यत समाविष्ट करण्यात आले नाही. केंद्रामध्ये लोधी समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीवरून १९ जानेवारी  २०१९ ला तहसील कार्यालयावर जन आंदोलन मोर्चा काढण्यात आला. ५ डिसेंबर २०१६ रोजी देशाच्या राजधानीत जंतर-मंतर मैदानावरती राष्ट्रव्यापी आंदोलन केले होते. यामध्ये लाखो लोधी बांधव उपस्थित होते. ५ डिसेंबर २०१७ ला लोधी समाजाचे प्रतिनिधी मंडळाने समाजकल्याण मंत्री यांना भेटून आपल्या मागणीची जाणीव करून दिली होती. महाराष्ट्रात ओबीसीप्रवर्गात मोडत असलेल्या लोधी समाजाला केंदाच्या यादीतही ओबीसीमध्ये समाविष्ठ करण्याच्या मुख्य मागणीचे निवेदन आमदार चरण वाघमारे यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुमसर येथे देण्यात आले.
केंद्राच्या यादीत ओबीसीत मोडत नसल्याने महाराष्टातील सुमारे ४८ लाख लोधी समाज बांधवांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. मराठा आरक्षणाच्या सरकारी घोषणेनंतर आता लोधी समाज आरक्षणाकरीता वाट पाहत आहे.
देशातील १८ राज्यात लोधी समाज निवास करीत असून १४ राज्यात लोधी समाजाला केंद्राच्या ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे.तर २ राज्यात लोधी समाज एस.टी.प्रवर्गात आहे. मात्र महाराष्ट व झारखंड या दोन राज्यातील लोधी समाजाला अद्यापही केंद्राच्या इतर मागास प्रवर्गात समाविष्ठ करण्यात आलेले नाही. विधानसभा निवडणुकीपुर्वी सरकारने निर्णय न घेतल्यास लोधी समाज राजकारणाला बाजूला ठेवून निवडणुकीवर बहिष्कार करणार असल्याचे मत यावेळी अनेक मान्यवरांनी मांडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी लोधी समाज जिल्हा अध्यक्ष धनंजय बिरणवार, सचिव अनंतलाल दमाहे, खुशाल नागपुरे, देवशिंग सव्वालाखे, अंतलाल दमाहे, राजीव ठकरेेले, बिजेपी कार्यकर्ता श्यामसुंदर नागपुरे, चैनलाल मस्करे, ज्ञानेश्वर दमाहे,पाडुरंग मुटकुरे, हिरालाल नागपुरे, अंकुश दमाहे, हरीचंद बंधाटे, हावसु नागपुरे, वसंता लिल्हारे,  राजकुमारी लिल्हारे, अशोक मुटकुरे, बाणा सव्वालाखे, प्रताप लिल्हारे, पतीराम दमाहे, ज्ञानेश्वर बिरणवारे, विरेंद्र दमाहे,शैलेश लिल्हारे आदी उपस्थित होते.