पांगोली नदीवरील पुल धोकादायक,नवीन पुलाची सरपंच संघटनेची मागणी

0
26

गोरेगाव,दि.8ः- तालुक्यातील म्हसगास-घोटी मार्गावर असलेल्या पांगोली नदीवरील पुल नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. या पुलाच्या दोन्ही बाजुला सुरक्षा कठडे नसल्याने अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत. त्यातच पुलाची उंची व रुंदी कमी असल्याने नेहमीच अपघाताची शक्यता बळावलेली राहते. त्यामुळे या नदीवर नवीन पुल तयार करण्याची मागणी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सोमेश रहांगडाले यांनी केली असून प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
पांगोली नदीवरील म्हसगाव-घोटी दरम्यान ८० वर्षापूर्वी या पुलाचे बांधकाम करण्यात आले. या पुलावरुन म्हसगाव, गोरेगाव, घोटी, चिल्हाटी, बाम्हणी, गिधाडी, आंबेतलाव, कालीमाटी, आमगाव, तेढा, तुमसर या गावातील नागरिकांची ये-जा राहते. मात्र पुलाचे ८० वर्षाचे झाल्याने तसेच देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने या पुलाची अवस्था जीर्ण झाली आहे. त्यातच पुलाची उंची व रुंदी कमी असल्याने नेहमीच अपघाताची शक्यता बळावलेली राहते. तर पुलाच्या दोन्ही बाजुला सुरक्षा कठडे नसल्याने अनेकदा पुलाखाली पडून अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसात नाल्याला पुर आल्यास चांगलीच फजिती होते. असे असताना जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात सरपंच संघटनेचे अध्यक्ष सोमेश्वर रहांगडाले यांच्या नेतृत्वात बांधकाम विभागाला निवेदन देवून नदीवर नवीन पुलाचे बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याला एक वर्षाचा कालावधी लोटूनही संबंधित अधिकाèयांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या पुलावर तातडीने नवीन पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अन्यथ बांधकाम विभागाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा रहांगडाले यांनी दिला आहे.