पवनी तालुक्यातील विविध योजनांचा घेतला खासदार मेंढेनी आढावा

0
38

पवनी,दि.09ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातर्गंत येत असलेल्या पवनी तालुक्यातील विविध कामांचा तसेच राबविण्यात येत असलेल्या शासकीय योजनांचा आढावा खासदार सुनिल मेंढे यांनी पंचायत समितीच्या सभागृहात गुरुवारला घेतला.त्यात प्रधानमंत्री आवास योजना, शेतकरी सन्मान योजना, रमाई आवास योजना, इत्यादी विविध योजनांची तालुक्यात अंमलबजावणी समाधानकारक असून या पुढील काळात अधिक सुनियोजित पद्धतीने योजना राबविण्यासंबधी सुचना खासदार सुनील मेंढे यांनी दिल्या.आढावा बैठकीत नायब तहसीलदार चौधरी,बीडीओ श्रीमती तेलंग,उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेडगे, पंचायत समीती सभापती बंडू ढेंगरे, पंचायत समिती सदस्य मोहन आकरे, विलास काटेखाये, सुरेंद्र आयतुलवार, अमोल तलवारे, राजेंद्र फुलबांधे, मोहन सूरकर, किशोर पंचभाई, माधुरी नखाते तसेच नागरिक उपस्थित होते.
बैठकीत शेतकरी सन्मान योजनेत एकूण २१००० लाभार्थी असून प्रधानमंत्री आवास योजने साठी तालुक्यात २०१६-१७ मध्ये ७२६ पैकी ६६८,  २०१७-१८ मध्ये ९९८ पैकी ८१८ तर २०१८-१९ मध्ये ३१० पैकी १६६ घरे बांधून पूर्ण झाली असून, २०१९-२० मध्ये १६६८ पैकी एकूण ९२३ घरकुलांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तालुक्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेताना शेतीतील तसेच घरांचे झालेले नुकसान, त्यावरील उपाय योजना ह्यासंबंधी आढावा घेऊन संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्याचे खासदार मेंढे म्हणाले. बैठकीत रोवणी झालेल्या पिकांची टक्केवारी, पिक विमा योजना तसेच तालुक्यातील सिंचन योजन ह्यांचा देखील आढावा घेण्यात आला.