पशुसंवर्धन विभागाच्यावतीने तुरकर यांना दहा हजाराची मदत

0
28

गोंदिया,दि.०९ः- तालुक्यातील रापेवाडा निवासी शेतकरी देवचंद तुरकर यांच्या शेळ्यांची विषबाधेने मृत्यू झाल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या पशुसवर्धंन व कृषी सभापती शैलजा कमलेश सोनवाने यांनी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने मदत म्हणून १० हजार रुपयाचा निधी मंजुर करुन दिला.त्या मंजुर निधीचा धनादेश शेतकरी देवचंद तुरकर यांना जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती यांच्या कक्षात सभापती शैलजा सोनवाने,जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ.राजेश वासनिक,सामान्य प्रशासन विभागाचे उपमुकाअ नरेश भेंडारकर यांच्या उपस्थितीत देण्यात आला.यावेळी कमलेश सोनवने,qपडकेपारचे सरपंच सुधीर चंद्रिकापुरे,रापेवाडाचे पोलीस पाटील निहाल पारधी,सहा.पशु.प.अधिकारी महेंद्र हरिणखेडे आदी उपस्थित होते.