नागरिकापर्यंत सुविधा पोहचविणे हे आमचे कर्तव्य -आ.अग्रवाल

0
19

गोंदिया,दि.09 : क्षेत्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत सुविधा पोहचविणे हे आमचे कर्तव्य असून यासाठी आमचे निरंतर प्रयत्न सुरू आहेत. आज गोंदिया विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावापर्यंत पोचमार्ग, चावडी व सिमेंट रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे. कालव्यांची सफाई व बंधारे बांधकामाच्या भूमिकेमुळे क्षेत्रातील नागरिक आर्थिक विकासाच्या नव्या क्रांतीचा अनुभव घेत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुक्यातील ग्राम बघोली-कलारीटोला येथील जिल्हा परिषद शाळा सुरक्षाभिंत, रस्ता सिमेंटीकरण, समाज मंदिर व दोन बोअरवेल बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी, क्षेत्रातील जनतेने जो विश्वास दाखवून विधानसभेत पाठविले आहे, त्यावर खरे उतरण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक वर्षी धानाचे पीक हातून जाते. यंदा मात्र कालव्यांची सफाई करून प्रत्येकाच्या शेतापर्यंत पाणी पोहचले व चांगले पीक घेता आले आहे. भविष्यात तेढवा-सिवनी उपसा सिंचन प्रकल्पाचे पाणीही बाघच्या कालव्यांत सोडून आणखीही क्षेत्राला सिंचीत करण्याचे प्रयत्न असल्याचे सांगीतले.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, बाजार समिती उपसभापती धनलाल अंबुले, केशोराव मातरे, मनोज बेलवंशी, तिरधन बिसेन, नकुलप्रसाद लांजेवार, बिसराम पाचे, नरेंंद्र मेने, हेमराज दंदरे, मुकेश बिसेन, मदनलाल गडपेले, मनोहर नागवंशी यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.