गोंदियात शनिवारी ओबीसी,एससी,एसटी,अल्पसंख्याक समाजाचा जनआक्रोश आंदोलन

0
29

गोंदिया,दि.०९ः-गोंदिया जिल्ह्यात मोठ्या संख्येने असलेल्या ओबीसी समाजासह एससी,एसटी,भटक्या विमुक्त जाती,जमाती अल्पसंख्याक बहुजन समाजाच्या विविध मुद्यांना घेऊन तसेच ईव्हीएम हटाव आरक्षण बचाव मोहिमेंतर्गंत सqवधान मैत्री संघ,ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवासंघ,आदिवासी एम्पलाईज संघटन आदी विविध संघटनांच्या माध्यमातून उद्या शनिवार १० ऑगस्ट रोजी जनआक्रोश रॅलीचे आयोजन गोंदियात करण्यात आले आहे.शहर व ग्रामीण भागातून रॅलीच्या माध्यमातून येणाèया सर्व समाजबांधवानी इंदिरा गांधी स्टेडीयम जवळील कार्यक्रमस्थळी सकाळी ११ वाजता मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
या जनआक्रोश आंदोलनांतर्गत लोकशाही वाचवा,सqवधान वाचवा यासोबतच ईव्हीएम हटवा लोकशाही वाचवा मोहीम गावखेड्यापर्यंत पोचविण्यात येणार आहे.ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावे,ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे,ओबीसींचे नोकरीतील बँकलाग भरण्यात यावे,ओबीसी विद्याथ्र्यांना वसतीगृहासह सर्व सुविधा देण्यात यावे,१९९६ चा पेसा कायदा,२००६ चा वनाधिकार कायदा,१९९९ चा एससीएसटी अत्याचार कायदे कार्यान्वित करण्यात यावे.डॉ.पायल तडवी प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा देण्यात यावे आदी मुदयांना घेऊन हे आंदोलन असून या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी सेल्प रिसपेक्ट मुव्हमेंटचे बलीराज धोटे,जावेद पाशा,प्रा.रमेश राठोड,डॉ.नामदेव किरसान,एड.सविता बेदरकर,एड.नरेश शेंडे,विक्की बेलखोडे,डॉ.प्रशांत मेश्राम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यावेळी अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संसदेच्यावतीने काव्यमैफलिचे आयोजन करण्यात आले आहे.यात शिक्षणाचे बाजारीकरण,ईव्हीएम,रेल्वे,बँका,बीएसएनल,ओनजीजीसी सह उच्च पदावरील नौकरीतील खासगीकरण,मॉबलिqचग सारख्या घटनांचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.या जनाक्रोश आंदोलनात जिल्ह्यातील बहुजन समाज असलेल्या ओबीसी,भटक्या जाती,जमाती,एससी,आदिवासी,अल्पसंख्याक वर्गातील युवक,युवतीसंह समाजबांधवांनी मोठ्यासंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक समिती सqवधान मैत्री संघ,ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ,बहुजन युवा मंच,मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेडसह विविध जात संघटनांनी केले आहे.