मुख्य बातम्या:

वाशिम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेततासिका तत्वावर होणार शिल्प निदेशकांची नियुक्ती

  • २७ ऑगस्ट रोजी मुलाखती

वाशिम, दि. 1० : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सत्र २०१९-२० करिता निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर शिल्प निदेशकांची १३ पदे भरण्यात येणार आहेत. याकरिता शासन निर्णयानुसार मानधन देण्यात येईल. तरी इच्छुकांनी २७ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ११ वाजता आपल्या सर्व मूळ कागदपत्रांसह व छायांकित प्रतींसह मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित रहावे, असे वाशिम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी कळविले आहे.

तासिका तत्वावर भरण्यात येणाऱ्या शिल्प निदेशकांच्या पदांमध्ये सुतारकाम (कारपेंटर) विषयाची २ पदे, यांत्रिक मोटार गाडी (मेकॅनिक मोटार व्हेईक) विषयाची ४ पदे, यांत्रिक डीझेल (मेकॅनिक डीझेल) विषयाची २ पदे, यांत्रिक वाहन विद्युत व अणुभाग (मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स) विषयाची २ पदे, संधाता (वेल्डर) विषयाचे १ पद व वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) विषयाच्या २ पदांचा समावेश आहे. या सर्व पदांसाठी संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी, पदविका किंवा आय.टी.आय., सी.टी.आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच पदवीधारकांना १ वर्ष, पदविकाधारकांना २ वर्षे आणि आय.टी.आय., सी.टी.आय. उत्तीर्ण असणाऱ्यांना ३ वर्षे अनुभव असावा, असे वाशिम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Share