गोंदिया पंसच्या आमसभेत बीपीएल दाखला ग्रामपंचायतीतूनच देण्याचा निर्णय

0
13

गोंदिया,दि.10ःःगोंदिया पंचायत समितीतंर्गत येत असलेल्या गावातील सरपंच व उपसरंपचाच्या उपस्थीतीत पार पडलेल्या पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत गोंदिया तालुका सरपंच व उपसरंपच संघटनेच्या समस्यांचे निराकारण करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष तांडा येथील सरपंच मुनेश रहागंडाले यांनी दिली.
वार्षिक आमसभेला गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल,जिल्हा परिषद अध्यक्ष सीमाताई मडावी,शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले,गोंदिया पंचायत समिती सभापती माधुरीताई हरीणखेडे,गटविकास अधिकारी ईनामदार,उपसभापती चमनभाऊ बिसेन यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.तसेच प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी यांनीही या वार्षिक आमसभेला सामान्य प्रशासन विभागाचे उपमुकाअ नरेश भांडारकर यांच्यासोबत उपस्थिती लावली होती.यावेळी सरपंच-उपसरंपच संघटनेच्यावतीने काम करतांना येत असलेल्या समस्या मांडण्यात आल्या.यामध्ये प्रामुख्याने -प्रत्येक ग्राम पंचायत अंतर्गत यावर्षी ३२०० वृक्ष लागवड करण्यात आली. परंतु वृक्ष संगोपण करीता निधी ग्राम पंचायत कुठुन देणार, पालकमंत्री पांदन रस्ताचे कामाची निधी मिळालेला नाही ते  उपलब्ध करून देण्यात यावे,यावर्षीपासून अनेक दाखले बंद करण्यात आले, जसे की बीपीलचे दाखले पं स मध्ये बिडीओच्या माध्यमातून देण्यात येते अशा अनेक समस्या ठेवण्यात आल्या.शंकर टेंभरे (सरपंच खातीटोला),चिंतामण चौधरी (सरपंच अंभोरा) यांनी गावातील शाळेच्या शिक्षकासंबंधी समस्या ठेवल्या तर रवी पटले (सरपंच एकोडी ) नरेंद्र चिखलोंडे (सरपंच सावरी),नमीता तेढा (सरपंच नवरगांव खुर्द),युगेश्वरी ठाकरे (सरपंच कुड़वा),सौ. जांभुळकर (सरपंच तुमखेडा़) व अनेक सरपंचानी गावातील समस्या मांडल्या.त्यापैकी बहुतांश समस्यांचे निराकरण उपस्थित लोकप्रतिनिधींनी त्वरीत करुन दिले.त्यात प्रामुख्याने गावपातळीवर नागरीकांना बीपीएल दाखल्यासाठी पंचायत समितीपर्यंत धाव घ्यायची वेळ येऊ नये यासाठी गटविकास अधिकारी इनामदार यांनी हे दाखले ग्रामपंचायतमधूनच देण्याची ग्वाही दिली.