शहर विकासाचे पोट्रेट मुख्यमंत्र्यांना भेट;प्रगती पुस्तकाचे विमोचन

0
20

गोंदिया : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात गोंदिया शहराच्या विकासाकरिता अनेक योजनांना मंजूरी देण्यात आली.  कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाने पालिकेलादिला. अनेक योजनांचा आराखडा शासनाकडे मंजुरीकरिता प्रस्तावित आहे. अडीच वर्षांच्या कार्यकाळात रस्ते, पार्कींग प्लाझा, भाजी बाजार, नाट्यगृह, सौंदर्यीकरण, बगीचे, सर्वसुविधायुक्तअग्नीशमन वाहन, ओझोन कचरा गाड्या, तिर्थक्षेत्र विकास, घरकुल, नि:शुल्क नळ कनेक्शन, आर ओ वाटर कुलर, ८००० एलईडी लाईट, हायमास्ट, विद्युत जोडणी, शौचालये आदींची कामे पूर्णकरण्यात आली. अनेक मोठी कामे मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नाने गोंदिया पालिकेला ही कामे पूर्ण करताआली. त्याचबरोबर येत्या काही दिवसांत ३० कोटी रुपयांची कामे सुरू होणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार म्हणून नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळेयांनी प्रमुख कामांचे छायाचित्र असलेले पोट्रेट कोलाज तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोंदिया येथे(ता.३) जनादेश यात्रेनिमित्त आले असताना त्यांना भेट दिले. यावेळी पालकमंत्रीपरिणय फुके, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासकामांचे कौतूक करून यापुढे गोंदिया शहराच्या विकासाकरिता निधी कमी पडू देणारनसल्याचे आश्वासन दिले.

गोंदिया नगर पालिकेत भाजपचे सरकार येवून अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. यादरम्यान नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी पालिकेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य  यांच्यासमन्वयातून अनेक कामांना मंजूरी दिली. त्यातील बहुतांश कामे पूर्ण झाली. अनेक कामांचे प्रस्ताव शासनाकडे मंजूरीकरिता पाठविण्यात आले. त्या कामांची इत्यंभूत माहिती शहरवासीयांनाव्हावी, या उद्देशाने प्रगती पत्रक नावाचे पुस्तक तयार करण्यात आले आहे. या पुस्तीकेत झालेली आणि होणारी कामे यांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. या पुस्तीकेचे प्रकाशन मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ४ ऑगस्ट रोजी गोंदियातील गेट वे हॉटेल येथे करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. परिणय फुके, खासदार सुनील मेंढे, माजी पालकमंत्री राजकुमार बडोले, पक्षाचेजिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आमदार विजय रहांगडाले, आमदार, संजय पुराम, माजी आमदार रमेश कुथे, माजी जि. प. अध्यक्ष नेतराम कटरे, माजी भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, बाळाअंजनकर, नगर पालिकेचे उपाध्यक्ष शिव शर्मा, बंटी पंचबुद्धे, अमृत इंगळे आदी उपस्थित होते.