जि.प. शाळा पिंडकेपार येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहत

0
34

गोरेगाव,दि.११ः : गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाºया जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पिंडकेपार येथे ९ आॅगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत घासले हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून समितीचे सदस्य रमेश बिसेन, दुर्योधन पटले, राजाराम गाते, प्रमिला गाते, रहांगडाले, जोशी, कविता राऊत, मुख्याध्यापक पि.डी. पटले, शिक्षक मुनेश्वर कटरे, ती. पारधी, युवराज बोपचे, ब्राह्मणकर आदी उपस्थित होते. सदर पाहुण्यांनी आदिवासी दिवस का साजरा करण्यात येतो या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देवून मार्गदर्शन केले. या दिनाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थीनी-विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शालेय गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पि.डी. पटले यांनी केले. संचालन शिक्षक मुनेश्वर कटरे यांनी केले तर आभार शिक्षक बोपचे यांनी मानले.