मंगलग्रहावर भरारी घेण्यासाठी जि.प.उच्च प्राथ.शाळा बिरसीच्या विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी

0
24
गोंदिया,दि.11:- जिल्हा परिषदेच्या आमगाव तालुक्यातील बिरसी येथील शाळेच्या  इ.७ थी च्या १९ विद्यार्थी व शिक्षकाचे नाव जुलै २०२० मध्ये मंगल ग्रहावर भरारी घेणाऱ्या अवकाशयानाच्या यादीत पोहचली आहेत.इ.७थी.चे वर्गशिक्षक संतोष रहांगडाले यांनी ‘नासा’ च्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यां नावाची ऑनलाईन नोंदणी केली आहे
अमेरिकेच्या ‘नासा ‘ संस्थेचे ‘रोव्हर २०२०’ हे यान मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. या अंतरिक्ष यानाबरोवर ‘स्टेनसिल्ड चिप’ वर ३आपली नावे पाठवून मानवी इतिहासातील पाऊलखुणा दुसऱ्या ग्रहावर सोडण्याची ऐतिहासिक संधी ‘नासा’ ने जगभरातील सामान्य जनतेला उपलब्ध करून दिली आहे. ही मोहीम नासा चंद्र मोहीम ते मंगळ मोहिमेच्या प्रवासापर्यंतच्या  मोहिमेला उद्देशून सार्वजनिक सहभाग अंतर्गत राबवली जात आहे. ‘नासा’ च्या कॅलिफोर्निया येथील प्रयोगशाळेत इलेक्ट्रॉनिक बीमचा वापर करून सिलिकॉनच्या चिपवर अतिसूक्ष्म आकारात नावे ‘स्टेन्सिल ‘ केली जाणार आहेत.
एक डेमी आकाराच्या चिपवर 10 लाख नावे मावणार असून या चिप रोव्हरवर काचेच्या आवरणाखाली जतन करून मंगळावर पाठवल्या जाणार आहेत. ऐतिहासिक मंगळ अभियानासाठी तयारी करतांना सर्व जण त्यात सहभागी व्हावेत, सर्वांनी त्याची माहिती व्हावी ,या उद्देशाने ‘नासा’ हा उपक्रम राबवत आहे.बिरसी सारख्या  खेडेगावात मुलांच्या मनात प्राथमिक शिक्षणापासून अवकाश संशोधनाबद्दल माहिती घेऊन त्यांना शालेय शिक्षणाबरोबर नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून आपली नावे मंगळावर जाणार्या अवकाशयानाच्या यादीत पाठवण्याची संधी शिक्षकांनी उपलब्ध करून दिली आहे.